Home » महाराष्ट्र माझा » ना.मुंडे यांनी बालगृहातील मुलींबरोबर केला योग दिन साजरा.

ना.मुंडे यांनी बालगृहातील मुलींबरोबर केला योग दिन साजरा.

ना.मुंडे यांनी बालगृहातील मुलींबरोबर केला योग दिन साजरा.

डोंगरचा राजा / आँनलाईन

– ना.पंकजा मुंडे यांनी बालगृहातील मुलींबरोबर योग साधना करुन साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन.

– योग केल्याने मानसिक, शारिरीक मजबुती बरोबरच चांगल्या पणाची भावना निर्माण होते.

– ग्राम विकास,महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे*

मुंबई – योग एक प्रकारची उर्जा आहे. योगाचे विविध आसन मानसिक आणि शारीरिक मजबुती बरोबरच चांगल्या पणाची भावना निर्माण होते. मानव मनशक्तीला गतीमान करते. बौध्दिक पातळी सुधारते आणि भावनांना स्थिर ठेवून उच्च पातळीच्या एकाग्रता मध्ये वाढ करण्यास मदत करते असे ग्राम विकास, महिला व बाल विकास मंत्री, पंकजा मुंडे यांनी सांगितले.

डोंगरी येथील निरिक्षण गृह, बाल गृहातील मुलींसोबत आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त योग साधना केल्यानंतर माध्यम प्रतीनिधीशीं संवाद साधतांना त्या बोलत होत्या.

मंत्री मुंडे म्हणाल्या, 21 जून रोजी पूर्ण जगात योग दिन साजरा केला जातो. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंतरराष्ट्रीय योग दिनांची सुरुवात केली. योग ही भारताची हजारो वर्षापासूनची परंपरा चालत आली आहे. नित्य योग साधना केल्याने शरीर निरोगी रहाते. बाल वयापासूनच योग केल्यास त्याचा अधिक प्रमाणात लाभ मिळतो, त्यामुळे बाल गृहात येऊन बालकांना प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांच्या सोबत योग साधना करुन आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.