Home » ब्रेकिंग न्यूज » नवीन धोरण राबवणार – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

नवीन धोरण राबवणार – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

नवीन धोरण राबवणार – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

डोंगरचा राजा / आँनलाईन

– दुरावस्था झालेल्या शाळा वर्ग खोल्यांच्या दुरूस्तीसाठी नवीन धोरण राबविण्यात येणार* -ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

– राज्यातील सर्व दुरावस्था झालेल्या शाळा खोल्यांचे टप्प्या टप्प्यात दुरूस्ती

मुंबई – राज्यातील सर्व दुरावस्था झालेल्या शाळेतील वर्ग खोल्यांचे सेस फंड, जिल्हा नियोजन समिती निधी आणि लेखाशिर्ष २५१५ या निधीतुन टप्प्या टप्प्यात दुरूस्ती करण्यात येणार आहे. दुरावस्था झालेल्या शाळा खोल्यांच्या दुरूस्तीसाठी लवकरच नवीन धोरण राबविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

विधानसभेत प्रश्नोउत्तराच्या तासात विधान सभा सदस्यांनी कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा तालूक्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झाले बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्या बोलत होत्या.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, बीड जिल्हयाती दुरावस्था झालेल्या वर्ग खोल्यांची दुरूस्तीचे कामे करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व शाळांची अ, ब, क अशी वर्गवारी करण्यात येईल. क गटात मोडणा-या शाळा खोल्यांच्या दुरूस्तीसाठी प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी या वेळी सांगितले.

मंत्री मुंडे म्हणाल्या पन्हाळा तालूक्यात १९४ शाळा असून ९१ शाळा मधील २११ वर्ग खोल्यांची दुरूस्ती व १७ शाळांमधील ५२ वर्गखोल्या धोकादायक आहेत. ९१ शाळांमधील २११ खोल्यांपैकी ३५ शाळामधील वर्ग खोल्या दुरूस्ती करण्यासाठी सन २०१८-१९ या अर्थिक वर्षामध्ये ६४ लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.