झाडांची पुजा सत्यवान सावित्रीचे प्रेम दर्शविते – कवयित्री कळसकर
डोंगरचा राजा / आँनलाईन
स्रियांनी जुन्या रुढी परंपरे मधे अडकून न राहता स्वतःच्या कर्तृत्त्वावर पुढे पुढे जात राहावे व स्वतः ला सिध्द करावे. वडपौर्णिमेला वडाचे झाडाची पुजा करतांना सत्यवान सावित्री चे प्रेम आपल्याला दर्शविते त्याच बरोबर कुटुंबातील एकोपा व पर्यावरणाचे महत्त्व सुद्धा सांगत असते आपण त्याचा आदर करून माणसां माणसांतील एकोपा जपावा असे प्रतिपादन कवयित्री अनिता कळसकर यांनी सुरूवातीला रसिकांना सांगून कार्यक्रमाची रंगत वाढविली..मसापच्या कार्यवाह सौ आशाताई जोशी यांनी प्रास्ताविक करून मसापच्या कार्यक्रमांची माहिती दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषद कल्याण शाखेने आयोजित केलेल्या वट-वट सावित्री चारोळी उत्सव या कार्यक्रमात उषा रामवाणी या प्रमुख पाहुण्या म्हणून होत्या. या कार्यक्रमात २८ मान्यवर कविंनी सहभागी होऊन पर्यावरणाचे महत्त्व व वड पौर्णिमेचे महत्त्व आपल्या चारोळी मधुन सांगितले.
चारोळी हे कवितेचेच एक छोटे स्वरूप असुन अवघ्या चार ओळींमधुन आपल्या भावना रसिकां पर्यंत पोहचविण्याचा सोपा विषय असुन तो सर्वच कविनी यशस्वीपणे सांभाळला. म. सा. प. च्या या कार्यक्रमात ठाणे,मुरबाड,डोबिंवली ,भिवंडी पनवेल या ठिकाणाहून कविनी हजेरी लावली होती. अतिशय देखण्या अशा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवयित्री अनिता कळसकर यांनी केले.याप्रसंगी जेष्ठ लेखक जनार्दन ओक,कवी राजीव जोशी ,मसाप कार्याध्यक्ष कथाकार भिकू बारस्कर ,अरविंद बुधकर,किरण जोगळेकर इत्यादी मंडळींसह अनेक साहित्यिक ,रसिक उपस्थित होते.