सरकारचे अभिनंदन — दिलीप भोसले
डोंगरचा राजा / आँनलाईन
— संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील सहाशे रुपयांचे मानधन एक हजार रुपयांवर सरकारचे अभिनंदन…
— दिलीप भोसले यांच्या आंदोलनाला यश……
बीड — संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना महिना एक हजार रुपये मानधन मिळावे या मागणीसाठी गेली अनेक वर्ष आंदोलन करून सरकार या गरिबांकडे लक्ष द्यावे या मागणीसाठी व वेळोवेळी आंदोलन करून प्रसंगी आंदोलन लाठ्याकाठ्या खाऊ निराधारांना न्याय मिळवून देण्यासाठी सैराट मोर्चा आत्महत्या आंदोलन चक्र मारो आंदोलन बांगडी मोर्चा जागरण गोंधळ आंदोलन यासारखे वेगळे आंदोलन करून स्वतःवर केसेस दाखल करून निराधारांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी वेगवेगळे आंदोलने केली व सरकारला निराधारांचा सहाशे रुपये अनुदान वाढवून 1000 करावा ही मागणी लावून धरली त्याचा परिणाम कालच्या अर्थसंकल्पात सरकारने निराधारांचे अनुदान सहाशे रुपये वरून एक हजार रुपये केला आहे हे आमच्या आंदोलनाचे यश आहे व या सरकारचं अभिनंदन करण्यात येत आहे असं संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष दिलीप भोसले यांनी सांगितले आहे यापुढील काळात वाढती मागणी लक्षात घेऊन प्रत्येक दोन वर्षाला सरकारने निराधारांचा अनुदान वाढवून त्यांना सन्मानाने कसे जगता येईल यासाठी प्रयत्न करावेत निराधारांना त्यांना मानसन्मान मिळवून देण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत निराधार सोबत राहणार असून त्यांच्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले यासंदर्भात लवकरच मोठा कार्यक्रम घेऊन निराधारांच्या वतीने सरकारचे आभार मानण्यात येणार आहे