Home » माझा बीड जिल्हा » वाजत गाजत बळीराजाच्या रथातून चिमुकले शाळेत

वाजत गाजत बळीराजाच्या रथातून चिमुकले शाळेत

वाजत गाजत बळीराजाच्या रथातून चिमुकले शाळेत

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

-नफरवाडी ज़ि.प.प्रा.शाळेचा उपक्रम गावकरी सहभागी

आज दि 17/6/19 सोमवार शाळेचा पहिलाच दिवस इयत्ता पहीलीत प्रवेशित होणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून वाजतगाजत मिरवणूक काढुन त्यांना शाळेत वाजत गाजत नेऊन प्रवेश घेतले मिरवणूकीमध्ये, गावचे सरपंच,उपसरपंच , मा.सरपंच,मा.उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, शा.व्य.समिती सर्वसदस्य, शिक्षणप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणुकीनंतर शाळेत नवगतांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.
तदनंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तके वाटप करण्यात आले . सरपंच बंडू सवासे यांच्याकडून ई.1 ली च्या विद्यार्थ्यांना पाटी-पेन्सिल (लेखन साहित्य) देण्यात आले.तसेच पहिले पाऊल झाड लावून या उपक्रमांतर्गत शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.शाळेच्या माजी विद्यार्थिनी पूजा औटे,राधा ढेरे ,10 वी च्या परिक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
एरवी शाळेचे नाव काढताच आईच्या पदराआड दडणारं छकुलं आज मात्र विजयी सैनिका सारख डौलात नव्या सवंगड्यांच्या ताफ्यात सहभागी होत होतं . पहिल्याच दिवशी १०० % प्रवेश झाले.
अश्या प्रकारे प्रवेशोत्सव मोठया थाटामाटात साजरा केला लहान मुले मोठया आनंदाने आज शाळेच्या पहिल्याच दिवशी सहभागी झाले.

उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.खंडागळे सर,माने मॅडम,काकडे मॅडम,उपदेशी मॅडम,वावरे मॅडम यांच्यासह गावकरी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.