Home » माझा बीड जिल्हा » शंभर रुपयात गॅसचे वाटप – अँड.अजित देशमुख

शंभर रुपयात गॅसचे वाटप – अँड.अजित देशमुख

रंजेगावात शंभर रुपयात गॅसचे वाटप-अँड.देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन

– गुरुकृपा गॅस एजन्सी कडून रंजेगावात शंभर रुपयात गॅसचे वाटप

– सर्व गॅस एजन्सीने आदर्श घ्यावा – अँड. अजित देशमुख

बीड — केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजने अंतर्गत रंजेगाव, तालुका बीड येथे एकतीस गॅसचे वाटप करण्यात आले. बीड येथील गुरुकृपा एच. पी. गॅस एजन्सी, धानोरा रोड, बीड या एजन्सी कडून हा उपक्रम राबवण्यात आला. रंजेगाव येथील आसाराम लक्ष्मण आबुज आणि चंद्रकांत बाबुराव आबुज यांच्या पुढाकारातून गावातील एकतीस लाभधारक महिलांना गॅसचे वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांना थेट लाभ देत या एजन्सीने फक्त शंभर रुपयामध्ये गॅसची टाकी, रेग्युलेटर, गॅस पाईप आणि दोन बर्नरची शेगडी इत्यादी साहित्य दिले. केवळ शंभर रुपयात लाभ मिळाल्याने गावातील जनतेसाठी हा आनंदाचा आणि चर्चेचा विषय ठरला.

कोणतीही योजना राबवत असताना ती प्रभावीपणे राबवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्याची गरज असते. प्रशासन भ्रष्ट आहे, जनतेची कामे होत नाहीत, जाणीवपूर्वक दिरंगाई केली जाते, योजनेचा लाभ ठरलेल्या दराने दिला जात नाही, भ्रष्ट कारभार बोकाळला आहे, असे आरोप करण्यापेक्षा कारभार पारदर्शक कसा करता येईल. याचा विचार केला तर त्यातून समाजाला नक्कीच दिशा मिळत असते.

आसाराम लक्ष्मण आबुज आणि चंद्रकांत बाबुराव आबुज या दोन शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका पार पाडत, गावात या योजने अंतर्गत गॅस पुरवण्याची तयारी केली. या योजनेबाबत त्यांनी बीड येथील अँड. अजित देशमुख यांच्याकडून माहिती घेतली. गावातील गोरगरीब जनतेला गॅस वाटप करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला गुरुकृपा एजन्सीने साथ दिली.

दुष्काळी परिस्थितीमध्ये गेल्या काही वर्षात बीड जिल्ह्यात गंभीरता आली आहे. सामान्य जनता आणि सामान्य शेतकऱ्यांना खर्च करण्यासाठी पैसा हातात नाही. अशा परिस्थितीत मध्ये गावात एकतीस गॅसचे वाटप करत असताना लाभार्थींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून जात होता. कोणतेही पद नाही, मात्र प्रामाणिकपणा आहे, अशा या आसाराम आणि चंद्रकांत आबुज यांनी घेतलेली मेहनत गावात चर्चेचा विषय ठरली. त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

उज्वला गॅस योजने अंतर्गत गॅसची टाकी, रेगुलेटर, पाईप आणि शेगडी इत्यादी साहित्य फक्त शंभर रुपयात दिले जाते. जिल्ह्यातील सर्व एजन्सी मार्फत ही योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. मात्र ती प्रामाणिकपणे राबविली जात नाही. यात दलाल शिरल्याने लाभार्थ्यांना लुटले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या गुरुकृपा एजन्सीने ही योजना प्रामाणिक पणाने राबवत सर्व वस्तू फक्त शंभर रुपयात दिल्या. त्यामुळे ही एजन्सी कौतुकास पात्र ठरली आहे. गावकऱ्यांनी एजन्सी मालक, मॅनेजर एस. एच. राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानले आहेत.
या एजन्सीच्या कामाचा आदर्श जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीने घ्यावा. लाभधारकांनी केवळ शंभर रुपयातच लाभ घ्यावा. याच वस्तू घ्याव्यात, गरज नसताना भारी शेगडी घ्या, म्हणून एजन्सीने ती ग्राहकाच्या गळ्यात घालू नये, जनतेनेही भूलथापांना बळी पडू नये, असे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.