राज्य मंत्रिमंडळात 13 नव्या सदस्यांचा समावेश
डोंगरचा राजा / आँनलाईन
– 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांना राज्यपालांनी दिली शपथ.
मुंबई – राज्याच्या मंत्रीमंडळात आज 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री असून त्यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
राजभवनाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास मंत्रिमंडळातील सदस्य, नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, कार्यकर्ते यांच्यासह यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह राज्य प्रशानातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, ऍड. आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, डॉ. सुरेश खाडे, डॉ.अनिल बोंडे, प्रा. डॉ. अशोक उईके,प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देण्यात आली.
तर राज्यमंत्री म्हणून सर्वश्री योगेश सागर, अविनाश महातेकर, संजय (बाळा) भेगडे, डॉ. परिणय फुके आणि अतुल सावे यांनी शपथ घेतली. श्री. महातेकर यांनी गांभिर्यपूर्वक शपथ घेतली तर अन्य सदस्यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली. सोहळ्याची सुरुवात आणि सांगता राष्ट्रगीताने झाली.