मराठी पत्रकार परिषद राष्ट्रीय अधिवेशन तयारी..
डोंगरचा राजा / आँनलाईन
– नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची पुर्वतयारी बैठक उत्साहात
नांदेड – दि.१५ मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने घेण्यात येणारे राष्ट्रीय अधिवेशन यावर्षी नांदेड येथे होत आहे.या अधिवेशनाच्या पुर्वतयारीसाठी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ ,महानगर व तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दि.१५ रोजी शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली यावेळी पदाधिकाऱ्यांच्या सुचने प्रमाणे अनेक विषयावर चर्चा करून सर्वांनी एकोप्याने अधिवेशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करू अशी हमी दिली बैठक उत्साहात संपन्न झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर होते तर यावेळी विभागीय सचिव विजय जोशी जिल्हा सरचिटणीस सुभाष लोणे,महानगर अध्यक्ष विश्वनाथ देशमुख,सुरेश काशिदे,त्रिरत्नकुमार भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परिषदेचे माजी सरचिटणीस चारूदत्त चौधरी यांनीही भेट दिली.बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भवरे,यासिन बेग इनामदार,बाळासाहेब पांडे,महानगर कार्याध्यक्ष रविंद्र संगनवार,सहसचिव अॅड.दिंगबर गायकवाड,अनिल धमने,संजय कोलते,आजम बेग,कंधार तालुकाध्यक्ष अॅड.सत्यनारायण मानसपुरे, किनवट तालुकाध्यक्ष दुर्गादास राठोड,बिलोली तालुकाध्यक्ष दादाराव इंगळे,गणेश कत्रुवार,मुदखेड तालुकाध्यक्ष इश्वर पिन्नलवार,हिमायतनगर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पंदलवाड, गजानन कानडे,चंदन मिश्रा,साहेबराव हौसारे,शेख जबार,गोविंद गोडसेलवार,परमेश्वर शिंदे,पिराजी गाडेकर,गंगाप्रसाद यन्नावार आदी उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवर पदाधिकाऱ्यांसह,महानगर, तालुका पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सुचना करणारी मत व्यक्त केली.बैठ खेळीमेळीने उत्साहात संपन्न झाली शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने सरचिटणीस सुभाष लोणे यांनी आभार मानून सभा संपन्न झाल्याचे घोषित केले.