Home » ब्रेकिंग न्यूज » तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..

डोंगरचा राजा / आँनलाईन

– गरिबीला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

– वडवणी तालुक्यातील परडी माटेगांव येथिल घटना

वडवणी — घरात अठरा विश्व दारिद्रय, शिक्षण शिकावे म्हटलं तर पैसा नाही आणि पैसा कमावावं म्हटलं तर हाताला काम नाही, घरात काय खावं याची पंचाईत अशा नैराश्यापोटी मध्यराञी अवघ्या २५ व्या वयातील तरुणानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडवणी तालुक्यातील परडी माटेगांव येथे शुक्रवार दि.१४ रोजीच्या मध्यरात्री घडली शनिवारी सकाळी ही घटना घडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परडी माटेगांव ता.वडवणी येथील रहिवाशी असणारे आणि अत्यंत गरीब परस्थितीशी दोन हात करुन कुटुंबाचा उदारनिर्वाह भागविणारे म्हणुन अंगदराव कदम यांच्या कुंटुबियांकडे पाहिलं जाते. याच कुटुंबातील एकुलता एक मुलगा असणारा संतोष अंगद कदम (वय वर्ष अंदाजे २५) याने शुक्रवार दि.१४ रोजीच्या मध्यरात्री गावातील शेजारी असणाऱ्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर संतोष कदम हा अत्यंत हुशार आणि प्रामाणिक युवक होता असे सांगण्यात आले आहे. संतोष कदम आणि त्यांचे आई-वडिल हे बीड येथील एका खाजगी तेल मिलमध्ये रोजंदारीवर कामाला होते. गेल्या दोन तीन दिवसांपासुन ते परडी माटेगांव येथे आले होते. परंतु गावी आल्यापासुन संतोष कदम हा अस्वस्थ होता. शिक्षण घेऊन उच्च शिक्षित बरोबर सरकारी नोकरी करावी अशी त्याची इच्छा होती. परंतु घरात विश्वा एवढ दारिद्रय, शिक्षण घ्यावे म्हटले तर पैसा नाही आणि पैसा कमावाव म्हटलं तर हाताला काम नाही, अगोदरच वडिलाने चार बहिनीचे कसबसे लग्न केले आहे. घरात काय खावं म्हटलं तर खाण्याची बडी पंचायत आहे. या नैराश्यापोटी संतोष कदम या एकुलत्या एक मुलगा असणाऱ्या तरुणानी मध्यराञी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आणि काल शनिवारी सकाळी हि घटना उघडकीस आली असुन संतोष कदम यांच्या जाण्याने परडी माटेगांव या गावावर शोककळा पसरली असुन प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.