Home » देश-विदेश » परशुराम सेवा संघाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

परशुराम सेवा संघाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

परशुराम सेवा संघाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

परशुराम सेवा संघ बीडच्या वतीने दहावी, बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या 51 गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे दि.14 जून रोजी दत्त मंदीर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमाकांतराव निर्मळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणूनच बलभिम महाविद्यालयाचे उपप्राचार्य विद्यासागर पाटांगणकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष गजानन जोशी यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना प्रा.विद्यासागर पाटांगणकर म्हणाले की, आज कालची 10 वी 12 वीची मुले अतिशय हुशार आहे. शिक्षणाच्या पध्दतीत बद्दल झालेला आसून मुले आज एवढी टक्केवारी घेताय हे देखील कौतुकास्पद आहे. त्यांनी जे या परीक्षेत चांगले गुण घेतले त्यात त्यांची मेहनत देखील तेवढी आहे. पुढे देखील हे विद्यार्थी अशीच टक्केवारी घेऊन आदर्श भावी पिढ्यांना जन्म देतिल व देशाचे भवितव्य घडवतील. हे गुणवंत विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातील हिरे आहेत, कॉलेजेस कोणतेही आसो काही फरक पडत नाही विद्यार्थ्यांची अंगी चांगले गुण असणे महत्वाचे आहे असेही ते म्हणाले. तर अध्यक्षीय भाषणात रमाकांतजी निर्मळ यांनी  बोलतांना सांगितले की, आजची पिढी खूप हुशार करायची आसेल तर गुरू व शिष्य नाते खुप दृढ झाले पाहिजे व आदर्श शिक्षक व विद्यार्थी म्हणून जगले पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या आई – वडीलांचे मनःपूर्वक कौतुकही त्यांनी केले. तसेच मंगलताई आगवान यांनी गुणवंत विद्यार्थी यांना मार्गदर्शन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बाळासाहेब थिगळे, बाबा पाठक, संदीप कुर्लेकर, रमाकांत कुलकर्णी, अनिकेत कुलकर्णी, विजय कुलकर्णी, बबन कोळेश्वर, नितेश पाठक, संजयराव कुलकर्णी, हेमंत गोदिकर, महेश जोशी, रवींद्र अग्नीहोत्री, प्रविण निर्मळ, सचिन देशपांडे, प्रसाद कुलकर्णी, कमलाकर बेहेर,े ओंकार लिंग्रस, ओंकार देशपांडे, गजानन लव्हरीकर, मंगलताई जोशी, अर्चना जोशी, सुषमा थिगळे, सौ.मनिषा कुलकर्णी, तसेच मंगलताई केंडे, रोहिणी नाईक, रश्मी आगवान, भाग्यश्री कुलकर्णी, वर्षा कुलकर्णी, अमृता जोशी, व सर्व महिला पदाधिकारी व पुरुष पदाधिकारी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार सौ.रोहिणी नाईक यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.