Home » महाराष्ट्र माझा » जिल्हा परिषद शाळांचा कायापालट – ना.मुंडे

जिल्हा परिषद शाळांचा कायापालट – ना.मुंडे

जिल्हा परिषद शाळांचा कायापालट – ना.मुंडे

डोंगरचा राजा / आँनलाईन

– ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचा कायापालट..

– जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्येत 23 हजारांनी वाढ –पालक मंत्री पंकजा मुंडे

बीड – ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा कायापालट केला आहे जिल्ह्यातील शाळांच्या सुधारणांसाठी 25 कोटी रुपये खर्च करण्यात आला असून या माध्यमातून झालेल्या बदलामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या मध्ये 23 हजारांनी वाढ झाली आहे असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

सांसद आदर्श ग्राम पोहनेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पालक मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते झाला ,या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, सभापती शिक्षण व आरोग्य राजासाहेब देशमुख , सभापती बांधकाम यूद्धजीत पंडीत, सभापती समाज कल्याण संतोष हांगे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे , आरोग्य उपसंचालक एकनाथ माले, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटेे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आर बी पवार, शिक्षणाधिकारी माध्यमिक भगवान सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक राजेश गायकवाड, तसेच शैलेजा गर्जॅ, राजेंद्र मस्के आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन
इमारतीचे उद्घाटन

मंत्री मुंडे म्हणाल्या, शाळेच्या देखण्या इमारतीची देशपातळीवर दखल घेण्याइतके सुंदर काम आदर्श संसद ग्राम मध्ये उभे राहिले आहे. ही शाळा भूषणावह असून विद्यार्थ्यांना उत्साह जाणवतो आहे. मी स्वत: जिल्हा परिषद शाळेत शिकली असल्याने मी मंत्री झाल्याने या शाळांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. जिल्हयातील शाळांसाठी 25 कोटी रुपये निधी दिला. याचबरोबर नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची अद्ययावत; सुविधा संपन्न इमारत इथे झाली आहे.
त्या म्हणाल्या ,ग्रामस्थांनी या इमारती सुंदर राहतील याची जबाबदारी घ्यावी. कुठेही थूंकून घाण करणाऱ्यांनी या खराब करु नये, त्यासाठी तुम्ही लक्ष द्यावे, त्यांना 500 रुपये दंड केला जावा. तरच हे सुंदर राहील.
श्रीमती मुंडे यांनी सांगितले शासनाच्या प्रयत्नांबरोबरच या शाळा चांगल्या राहण्यासाठी आपणच काळजी घ्यावी.आज जि.प. शाळात 23हजार विद्यार्थी वाढले असून मुला बरोबर मुली सुध्दा हुशारीने पुढे येत आहेत. त्यांचा जन्मदर वाढावा, प्राथमिक आरोग्य केंद्र आदीच्या सुविधांचा उपयोग समाजाला, गावाला व्हावा. या गावाच्या व भागाच्या विकासासाठी 25/15 योजनेतून साडे अकरा कोटी रुपयांची कामे केली. रस्ते, पूल मुळे आजूबाजूच्या भागाला जोडले आहे, असे मंत्री श्रीमती मुंडे यावेळी म्हणाल्या .
जि.प.अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार म्हणाल्या, गावाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या व राज्याच्या योजना राबविण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे यांनी जिल्हयाला निधी उपलब्ध करुन दिला. त्यातून अनेक विकास कामे झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री येडगे म्हणाले,हे गाव संसद आदर्श ग्राम असल्याने विकास कामांना गती मिळाली आहे. गावातील ग्रामस्थ , महिला, विद्यार्थी सर्वांसाठी आवास योजना, महिला बचत गटांच्या योजना, अंगणवाडी प्रवेश उत्सव, शाळा प्रवेश उत्सव राबवून विद्यार्थ्यांचे स्वागत असे उपक्रम राबविण्यात येत आहे असे श्री येडगे यांनी सांगितले.
यावेळ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करुन पाहणी केली, सुसज्य वर्ग खोल्या, शाळेत मॅथेमॅटीक लॅब, लॅग्वेज लॅब, ऑडीटोरीम तसेच शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडणारी इंडिया गेट, कोणार्क सुर्य मंदिर आदी एैतिकासिक वास्तूंची तसेच सांस्कृतिक, नैसर्गिक, वैज्ञानिक माहिती सांगणारे चित्रफलक लावण्यात आले आहेत. शाळेच्या सुंदरतेबाबत व सुसज्जतेबाबत श्रीमती मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.

पालक मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

सांसद आदर्श ग्राम पोहनेर येथे जिल्हा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान मधून पायाभूत सुविधा कक्षासह बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करून पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ,पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
नवीन इमारतीमध्ये प्रसुती व शस्त्रक्रिया कक्ष,नोंदणी कक्ष, स्त्री रुग्ण कक्ष, रिफ्रेक्षण कक्ष, पुरुष रुग्ण कक्ष, परीचारीका कक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्यालय आदींची त्यांनी यावेळी पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.