Home » माझा बीड जिल्हा » सभापती अशोक डक यांचा वाढदिवस

सभापती अशोक डक यांचा वाढदिवस

सभापती अशोक डक यांचा वाढदिवस

डोंगरचा राजा / आँनलाईन

– आरोग्य शिबीर, गुणवंतांचा सत्कार, वृक्षारोपण कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद

माजलगाव – माजलगाव बाजार समितीचे सभापती अशोक आबा डक यांचा वाढदिवस बुधवारी दि. १२ रोजी संपूर्ण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. यात यशवंत हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीर, गंभीर आजारावर माफक दरात शस्त्रक्रिया, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण, मोफत शैक्षणिक प्रमाणपत्र वाटप, व्होलीबॉल सपर्धा आदी सामाजिक कार्यक्रमाला तालुक्यातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दिवसभर अशोक डक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
सोन्नाथडीचे लाडके भुमीपुत्र आणि बाजार समितीचे सभापती अशोक आबा डक यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी दि. १२ यशवंत हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजीमंत्री प्रकाश सोळंके, माजी नगराध्यक्ष डॉ. अशोक तिडके, भाजपचे नेते अरुण राऊत, जयदत्त नरवडे, नगरसेवक डॉ. सुशील लोढा, डॉ. शिवाजीराव काकडे, डॉ. यशवंत राजेभोसले, पत्रकार सुभाष नाकलगावकर, पांडुरंग उगले, राज गायकवाड आदी उपस्थित होते. या शिबिरात प्रसिद्ध सर्जन डॉ. युवराज कोल्हे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रियांका राजेभोसले, डॉ. यशवंत राजेभोसले यांनी दिवसभरात १२६ रुग्णांची आरोग्य तपासणी केली, यातील २५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे निदान झाले असून यातील पाच रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी दवाखान्यात भरती करण्यात आले असून यांच्यावर माफक दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. कोल्हे यांनी दिली. यासह सोन्नाथडी या त्याच्या जन्मगावी आरोग्य शिबीर, विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक प्रमाणपत्राचे वाटप, व्होलीबॉलस्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी प.स. सदस्य मिलींद लगाडे, संचालक भारत शेजुळ, तुकाराम शेजुळयांच्यासह गावातील प्रतिष्टीत नागरीक उपस्थित होते. किट्टी आडगाव येथे वृक्षारोपण, गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक बाबासाहेब आगे, आनंत सोळंके, नारायण आगे,अमर आगे आदी उपस्थित होते. यासह तालुक्यातील अनेक गावात कार्यकर्त्यांनी अशोक आबा डक यांचा सत्कार करून त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.