Home » क्राईम स्टोरी » उपविभागीय पोलीस अधीक्षक डिसलेंची सिंघम कारवाई..

उपविभागीय पोलीस अधीक्षक डिसलेंची सिंघम कारवाई..

उपविभागीय पोलीस अधीक्षक डिसलेंची सिंघम कारवाई..

डोंगरचा राजा / आँनलाईन

— वडवणी शहर व तालुक्यातील प्रतिष्ठीत व्यक्ती धाडीत सापडले.

— चार लाख रोकडसह नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त.

– आत्तापर्यंतची सर्वात मोठी धाड.

वडवणी शहरातील लोकशाहीर आण्णभाऊ साठे चौकात शासनाचा परवाना असल्याचे भासवुन गेल्या कित्येक दिवसापासुन पत्त्याचा क्लब सुरू होता.याची माहीती डिवायएसपी व तहसीलदार यांना मिळाल्यानंतर आज दुपारी २ वाजता क्लब सुरू असतांना धाड टाकली.यामध्ये वडवणी व तालुक्यातील प्रतिष्ठीत व्यक्तींसह ३१ जणांवर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाचा परवाना असल्याचे भासवुन व कायद्यातील नियमांचा  चुकीचा अर्थ लावुन बाळासाहेब गलांडे हा वडवणीत बेकायदेशीररित्या पत्त्याचा क्लब चालवत होता.माजलगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीकांत डिसले,व वडवणीच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, पोलीस उप निरिक्षक पि.यु.अंधारे,पोलीस उपनिरिक्षक नरके ए.एन.पो.कॉ.शैलेश गादेवार,एस.पी.गंगावणे, या पथकाने आज दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान शहरातील साठे चौकातील पत्त्याच्या क्लबवर धाड टाकली.या धाडीत नगदी ३ लाख ८२ हजार ३३० रूपये व इतर जुगार साहीत्यासह ९ लाखाच्या जवळपास मुद्देमाल जप्त केला.या क्लबमध्ये ३१ जणांवर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४,५ १८८ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल.राज कला क्रीडा,सांस्कृतिक मंडळ या संस्थेच्या  नावाने सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबचा जिल्हाधिका-या कोणताच परवाना आढळुन आला नसल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीकांत डिसले यांनी सांगीतले.वडवणीत शहरात बेकायदेशीर सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर तालुक्यातील सरपंच,संचालक,माजी पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद शिक्षक यांच्यासह अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती जुगार खेळतांना पोलीसांनी ताब्यात घेतल्या.चार लाख रोकडसह नऊ लाखाच्या वर मुद्देमाल धाडीत जप्त केला असल्यामुळे शहरातील अत्तापर्यंतची सर्वात मोठी धाड असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.