Home » देश-विदेश » ना.आठवलेंचे उद्या चैत्यभुमीवर अभिवादन.

ना.आठवलेंचे उद्या चैत्यभुमीवर अभिवादन.

ना.आठवलेंचे उद्या चैत्यभुमीवर अभिवादन.

डोंगरचा राजा / आँनलाईन

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले दि.4 जूनला मुंबईत चैत्यभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार – गौतम सोनवणे

मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक ना रामदास आठवले यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या केंद्रियमंत्रीमंडळात दुसऱ्यांदा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून निवड झाली आहे.या निवडीमुळे देशभरातील आंबेडकरी जनतेत आनंद उत्साह साजरा होत आहे. नवनिर्वाचित केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले हे दि.4 जून ला पदभार स्विकारल्या नंतर लगेच मुंबईला येणार असून त्यांचे मुंबईत सांताक्रूझ येथील विमानतळावर रिपाइंतर्फे भव्य जंगी स्वागत करण्यात येणार आहे. स्वागत समारंभानंतर ना रामदास आठवले चैत्यभूमी येथे सायंकाळी 6 वाजता जाऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कृतज्ञतापूर्ण अभिवादन करणार आहेत अशी माहिती रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदिंच्या नवनिर्वाचित सरकार मध्ये अनेक जुन्या मंत्र्यांना स्थान देण्यात आलेले नाही. मात्र रिपब्लिकन राष्ट्रीय नेते ना रामदास आठवले यांना पुन्हा केंद्रियमंत्रीमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.यामुळे देशभरातील दलित बहुजनांमध्ये आंनद व्यक्त करून मिठाई वाटप करण्यात आली आहे.येत्या दि.4 जून रोजी दुपारी 4. 30 वाजता मुंबईत सांताक्रूझ विमानतळावर केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांचे आगमन होणार आहे.त्यावेळी मुंबईतील आंबेडकरी जनतेतर्फे आपल्या लाडक्या लोकनेत्याचे ना रामदास आठवलेंचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. स्वागत स्वीकारल्यानंतर ना रामदास आठवले सायंकाळी 6 वाजता चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत. यावेळी मुंबईतील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.