Home » महाराष्ट्र माझा » अल-ईम्रान प्रतिष्ठानचा स्वच्छता मोहिमेत सहभाग

अल-ईम्रान प्रतिष्ठानचा स्वच्छता मोहिमेत सहभाग

अल-ईम्रान प्रतिष्ठानचा स्वच्छता मोहिमेत सहभाग

नांदेड/प्रतिनिधी

महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोदावरी नदी पात्रातील पात्राच्या स्वच्छता मोहिमेत अल ईम्रान प्रतिष्ठान बिलोली येथील संस्था सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊनमोठ्या प्रमाणात गोदावरी नदीतीलगोळा झालेला प्लास्टिक,निर्माल्य,जलपर्ण,नाल्या मधुन वाहून आलेला कचरा व इतर प्रकारच्या कचराजमा करून स्वच्छता कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याने ह्या सामाजिक संस्थेच्या सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणार्‍या बिलोली येथील अल-ईम्रान प्रतिष्ठानचे ईम्रान खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी उत्स्फूर्तपणे गोदावरी पात्रातील घनकचरा व इतर निर्माल्य मोठ्या प्रमाणात गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याकरिता महानगर पालिका प्रशासनाकडे सुपूर्त केले अल-ईम्रान प्रतिष्ठान,सेवाभावी संस्था सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच हिरीरीने सहभाग घेते,आणि अल-ईम्रान प्रतिष्ठानने यापूर्वीही बिलोली सह जिल्ह्यातील विविध नगरपालिका क्षेत्रामध्ये स्वच्छता,पर्यावरण,तंबाखू मुक्त शाळा,बेटी बचाओ,स्वच्छ भारत,आदी मोहिम राबवून जनजागृतीचे कार्य केले आहे. त्याकरिता संस्थेच्या सदस्यांकडून खर्चाच्या रकमेतून निधी गोळा करून नांदेड़ जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेला ओला-सुका कचरा गोळा जमा करण्यासाठी कचराकुंड्या नगरपालिका क्षेत्रामध्ये लावल्या होत्या. तसेच वेळोवेळी सणोत्सव व मिरवणुकांच्या ठिकाणी थोर महापुरुशांची जयंती साजरी करने,नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी पाणी सरबत व अल्पोपहाराची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली आहे,याचप्रमाणे राज्य व केंद्र शासनाच्या वृक्षारोपणाच्या मोहिमेतही मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण व संगोपनाची जबाबदारी घेतलेली आहे. संस्थेच्या कार्याची दखल घेऊन आज पर्यंत अनेक मान्यवर प्रतिष्ठान यांनी अल-इम्रान प्रतिष्ठानचा पुरस्कार देऊन गौरव देखील केलेला आहे. महानगरपालिका आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गोदावरी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल लहुराज माळी व नवनिर्वाचित महापौर दीक्षा धबाले यांनी संस्थेच्या पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. स्वच्छता मोहिम राबविण्यासाठी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादीक, गुरूदीपसिंघ सिंधु,उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा फरतुल्ला बेग व इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अल-ईम्रान प्रतिष्ठानचे इम्रान खान, राजु मोरे,जगदीश पाटील,पत्रकार विनायक कामठेकर, खालेद चाऊस, आझम बेग, सय्यद अहेसान,सेवाकसिंग रायके, वसीम खान, शेख माजिद, मिलिंद सोनसळे, लक्ष्मण भवरे(संपादक), अशोक डांगे, प्रकाश शिरदे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.