Home » ब्रेकिंग न्यूज » उद्या मुख्यमंत्री,मंत्री,खासदार,आमदार गोपीनाथ गडावर..

उद्या मुख्यमंत्री,मंत्री,खासदार,आमदार गोपीनाथ गडावर..

उद्या मुख्यमंत्री,मंत्री,खासदार,आमदार गोपीनाथ गडावर..

डोंगरचा राजा / आँनलाईन

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त उद्या 3 जून सोमवार रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी गोपीनाथ गडावर झाली आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदार गोपीनाथ गडावर येणार आहेत. यावेळी ग्रामीण भागातील तरूणांसाठी रोजगार मेळावा व भाजपा शिवसेना महायुतीच्या मराठवाड्यातील सर्व नवनिर्वाचित खासदारांचा सन्मान यावेळी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे.

सकाळी 11 वा. रामायणाचार्य ह.भ.प. ढोक महाराज यांचे किर्तन होणार असून दुपारी 1 वा. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महादेव जानकर तसेच अन्य मंत्री उपस्थित राहणार आहेत. भाजपा महायुतीला बीडसह राज्यात घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रितम मुंडे या सर्व जनतेचे आभार मानणार आहेत. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

गोपीनाथ गडावर कार्यक्रमाची जय्यत तयारी
या कार्यक्रमासाठी कार्यक्रमस्थळी दीडशे बाय अडीचशे फुट आकाराचा भव्य वॉटर प्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. तसेच कार्यक्रम स्थळी आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंग, महाप्रसाद आदींचे नियोजन करण्यात आले असून कार्यकर्त्यांवर याची जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यक्रम नियोजनबद्ध रितीने व शांततेत पार पडावा यासाठी भाजपचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.