Home » माझा बीड जिल्हा » सभापती अशोक डक यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन.

सभापती अशोक डक यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन.

सभापती अशोक डक यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन.

 डोंगरचा राजा / आँनलाईन

– जय महेशच्या साखरेचा तात्काळ लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्यात यावेत

तालुक्यातील जय महेश साखर कारखान्याकडे उसाचे पेमेंट थकले आहे,साखर विक्रीचे टेंडर काढूनही खरेदीदार न आल्याने साखर विक्री झाली नाही परीणामी बिल देण्यात उशीर होत आहे तरी साखरेचा लिलाव त्वरित करून करून थकलेले बिल देण्यात यावी अशी मागणी सभापती अशोक डक यांनी निवेदनाद्वारे यांच्याकडे केली आहे .

तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी मोठ्या प्रमाणात ऊस येथील जय महेश कारखाण्याकडे गाळपास दिला परंतु अद्याप पर्यंत कारखान्याने उसाचे बिल दिले नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. कुठे मुलीचे लग्न मोडले आहे तर शेतकऱ्यांना पुढे लागणाऱ्या पेरणीच्या गरजा भागवण्यासाठी पैशाची मोठी अडचण होत आहे. या मुळे प्रशासनाने येथील साखरेच्या गोदमाला सील केले व साखर विक्रीचे टेंडरही काढले परंतु बाजारात साखरेला उठाव नसल्याने साखरेला कुणीही खरेदीदार मिळाला नाही प्रशासनाने एकदम 3लाख 84 क्वी. साखरेचे टेंडर काढल्याने विक्री झाली नाही आता प्रशासन पुन्हा साखर विक्रीचे टेंडर काढणार असून आता या वेळी 50 हजार पोत्यांचा लिलाव करावा. शेतकऱ्यांना त्वरित पैसे अदा करण्यात यावेत या मागणीसाठी बाजार समितीचे सभापती अशोक यांनी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची कैफियत मांडली व शेतकऱ्यांचे पैसे त्वरित अदा करण्याची मागणी लावून धरली पाच दिवसात प्रशासनाकडून या प्रश्नावर तोडगा काढला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यासाठी आंदोलन करण्याचा इशारा सभापती अशोक डक यांनी निवेदनाद्वारे दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.