पत्रकाराच्या घरावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न.
डोंगरचा राजा / आँनलाईन
— अंगाचा थरकाप डविणारी येलदरी येथील घटना
जिंतूर – अलिबाग येथील पत्रकारावर आमदारांनी केलेल्या हल्ल्याची बातमी ताजी असतानाच आज पहाटे सव्वातीन वाजता जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी आणि प्रशांत मुळी या पत्रकारांच्या घरावर पेट्रोल ओतून त्यांच्यासह कुटुंबियांना जिवंत जाळण्याचा अत्यंत भीषण आणि अंगाचा थरकाप उडविणारा प्रकार घडला आहे.. प्रवीण मुळी हे गेली तीस वर्षे सामानाचे काम करीत असून प्रशांत मुळे लोकमतचे काम करीत आहेत.. दोघेही निस्पृहपणे, प्रामाणिक पत्रकार म्हणून तालुक्यात ओळखले जातात.. असं असताना सारया कुटुंबाला जाळून ठार मारण्याचा कट कोणी रचला याबद्दल परिसरात चचा॓ सुरू आहे.. रात्री घरात महिला, मुलांसह बारा जण होते..त्यामुळं या घटनेचं गांभीर्य लक्षात यावे.. या प्रकरणी पोलिसात तक़ार दिली गेली आहे..
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषदेने या घटनेचा निषेध केला असून या भयंकर कटामागे कोणाचा हात आहे हे शोधून काढण्यासाठी या प्रकाराची सीबीआयतर्फे चौकशी करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे..
निवडणूक काळाल आपणास अनुकूल बातम्या दिल्या नाहीत म्हणून सातत्याने असे प्रकार घडत असावेत असा संशय देशमुख यांनी व्यक्त केला आहे.. सरकार पत्रकार संरक्षण कायदा करण्यास टाळाटाळ करीत असल्यानेच असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.. सरकारने पत्रकारांचे बळी जाण्याची वाट न बघता कायदा अंमलात आणावा अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे..