Home » माझा बीड जिल्हा » अँड.देशमुखांच्या लवाद न्यायाधिकरणाचे उदघाटन

अँड.देशमुखांच्या लवाद न्यायाधिकरणाचे उदघाटन

अँड.देशमुखांच्या लवाद न्यायाधिकरणाचे उदघाटन

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – केंद्र शासनाच्या अखत्यारीतील बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या संदर्भातील वाद चालवण्यासाठी आणि निर्णय देण्यासाठी बीड येथील अँड. अजित एम. देशमुख यांची “लवाद प्राधिकारी” या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था श्री. सतीश सोनी यांनी अँड. अजित देशमुख यांना ” लवाद प्राधिकरण ” प्रत्यक्ष चालू करण्यासाठी मान्यता दिली. आज “लवाद न्यायाधिकरण” चे आज उदघाटन करण्यात आले.

प्रा. सुनील धांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. अनिल बारकुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात अँड. अजित देशमुख यांनी फित कापून या न्यायाधिकरणाचे उदघाटन केले. मित्रमंडळी आणि उपस्थितांच्या सदिच्छा आणि शुभेच्छाच्या बळावर आपण येथे न्यायदानाचे काम करू. असे सांगून देशमुख यांनी जिवनातील पूर्व इतिहासावर प्रकाश टाकला. तर प्रा. धांडे म्हणाले की, देशमुख हे भ्रष्टाचार विरोधी कामाने राज्यात पुढे आले आहेत. त्यांच्याकडून चांगलेच काम होईल. तर डॉ. बारकुल म्हणाले की, जनतेच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून देशमुख सातत्याने जन सामान्यांची कामे करीत आले आहेत. जिल्ह्यांतच नव्हे तर जिल्ह्या बाहेरही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. या कामातूनही ते आपला वेगळा ठसा उमटवतील.

बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम २००२ मधील तरतुदींसह लवाद आणि समेट घडवून आणण्याचा कायदा १९९६ आणि अन्य कायद्याप्रमाणे येथे कामकाज चालेल. केंद्र सरकारच्या कृषी आणि सहकार मंत्रालयाच्या आदेशाने आणि अखत्यारीत ही नियुक्ती झाली आहे. कसल्याही आणि कुठल्याही शिफारशी शिवाय केवळ गुणवत्तेच्या बळावर ही नियुक्ती झाली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर राज्य सरकारने तयार केलेल्या या पॅनलला केंद्र सरकारने मान्यता या पूर्वीच दिली आहे.

बहुराज्यीय सहकारी संस्थांचे प्रमाण राज्यभरात मोठे आहे. या संस्थांच्या बाबतीतील संघटनात्मक, कायदे विषयक, आर्थिक आणि वसुली संदर्भातील वाद आता अँड. अजित देशमुख यांच्या लवाद प्राधिकरणात चालतील. यासाठी महाराष्ट्र राज्य हे कार्यक्षेत्र आहे. या लवाद प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयावर जर कोणत्याही वादी, प्रतिवादीला अपील करावयाचे असेल तर ते थेट मा. जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात करण्याची तरतूद आहे.

या कार्यक्रमास राज्याचे माजी आरोग्य संचालक डॉ. बी. डी. पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप जोशी, प्राचार्य जी. बी. सोंडगे, अँड. विजय धांडे, भास्कर पाटील, गोवर्धन मस्के, बाळासाहेब गलधर, नवनाथ नाईकवाडे, शिवाजी देसाई, आसाराम आबुज, राजेंद्र काळकुटे, अँड. सय्यद मुसा पटेल, अँड. भारत शिंदे, अँड. शिवाजी आगलावे, अँड. अभिमन्यु काळे, विश्वास डाके, डॉ. भगीरथ बांड, दत्तात्रय गायकवाड, अभिमान बावळे, अँड. बाळासाहेब राऊत, बळवंत राऊत, अशोक धांडे, अँड. बळीराम कदम, सय्यद आसद, अँड. विष्णू शिंदे, अँड. रविंद्र किर्दत, अँड. प्रवीण नेहरकर, अँड. गिरीष कुलथे, बलभीम बजगुडे, शेख यासिन पाशा, बालाजी पानझडे, अँड. संग्राम तुपे, गोपीचंद परदेशी, मनोज परदेशी, अडागळे टेलर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.