Home » महाराष्ट्र माझा » राज्य निमंत्रक पदी गोरे तर राज्य समन्वयक पदी वाघमारे

राज्य निमंत्रक पदी गोरे तर राज्य समन्वयक पदी वाघमारे

राज्य निमंत्रक पदी गोरे तर राज्य समन्वयक पदी वाघमारे

डोंगरचा राजा / आँनलाईन

— मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया सेलच्या *राज्य निमंत्रक* पदी *बापूसाहेब गोरे* तर *राज्य समन्वयक* म्हणून *अनिल वाघमारे* यांची निवड जाहीर!

मुंबई ( प्रतीनीधी)

मराठी पञकार परीषदेच्या वतीने सोशल मिडीयाचे प्रश्न जाणूण घेऊन मार्गी लावण्या साठी सोशल मिडीय सेलची स्थपना केली असून राज्य निमञंक पदी बापूसाहेब गोरे (पुणे )यांची तर राज्य समन्वयक पदी अनिल वाघमारे बीड यांची निवड करण्यात आली असून त्यांना नियूक्तीपञ देण्यात आले.
राज्यातील आठ हजार पत्रकारांचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील वाढत्या सोशल मीडियाच्या समस्या,प्रश्नाची सोडवणूक व्हावी याउद्देशाने नव्याने मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाची स्थापना केली आहे.
सोशल मीडियाची संघटनात्मक बांधणी होण्यासाठी आज मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत परिषदेच्या कार्यालयात घेण्यात आली.यावेळी सर्वानुमते मराठी पत्रकार परिषद सोशल मिडिया सेलच्या *राज्य निमंत्रक* म्हणून *बापूसाहेब गोरे* व *राज्य समन्वयक* म्हणून *अनिल वाघमारे* यांची निवड करण्यात आली.दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले या सेल मध्ये राज्यपातळीवर आणखी पाच पदाधीकारी लवकरच नियूक्त केले जातील तसेच जिल्हानिहाय निमंञक व सहनिमंञक नियूक्त केले जातील असे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वत एस एम देशमुख, अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, कार्याध्यक्ष गजानन नाईक,सरचिटणीस अनिल महाजन,कोषाध्यक्ष शरद पाबळे, टाईम्स आॕफ इंडीयाचे सह संपादक प्रफूल्ल मारपकवार, परीषदेचे उपाध्यक्ष विजय दगडू, जेष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर, विभागीय सचिव विजय जोशी, अण्णासाहेब बारगुडे, विशाल साळुंके, सुरेश नाईकवाडे, सोशल मिडीया सेलचे सुनिल वांळूज व राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.