Home » माझी वडवणी » दोघांची निर्दोष मुक्तता – अँड.लंगे

दोघांची निर्दोष मुक्तता – अँड.लंगे

दोघांची निर्दोष मुक्तता – अँड.लंगे

डोंगरचा राजा / आँनलाईन

— लोखंडी कत्तीने जबर मारहाण केल्याच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता

वडवणी – मौजे उपळी ता वडवणी येथील रामभाऊ सावंत व बाबुराव सावंत या दोघांनी त्यांच्या शेतातील सिताफळीच्या झाडावर फिर्यादी बळीराम मुंडे चा मुलगा सुधाकर मुंडे चढला म्हणून वरील दोघां पैकी बाबुराव सावंत यांनी त्यांचे हातातील लोखंडी कत्तीने त्याच्या डाव्या पायाचे टाचावर मारून गंभीर जखमी केले व रामभाऊ सावंत यांनी त्यास चापटा बुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या म्हणून त्यांचे विरुद्ध फिर्यादीने तक्रार दिली होती.
सदर तक्रारी प्रमाणे प्रकरनात वरील दोघांच्या विरुद्ध पो स्टे वडवणी येथे गु र क्र 64/2014 हा दाखल झाला व प्रकरण मा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वडवणी येथे कलम 326, 324, 323, 504,506 सह 34 भा.द.वी. प्रमाणे दोषारोप ठेऊन फिर्यादी कडून स्वत: , डॉक्टर, तपासी अंमलदार सह एकूण 9 साक्षीदार ची साक्ष घेण्यात आली परंतु आरोपींचे वकील अॅड श्रीराम लंगे यांच्या युक्तिवादावरून वडवणी न्यायालयाचे न्यायाधीष मा. कैलास चाफले साहेब यांनी दोघांची दि 13/05/2019 रोजी निर्दोष मुक्तता केली, आरोपींच्या वतीने अॅड. श्रीराम लंगे यांनी काम पाहिले व त्यांना अॅड भास्कर उजगरे, अॅड गजानन खताल व गोविंद लंगे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published.