Home » क्राईम स्टोरी » महिलेचा विनयभंग; कारवाई करा – एम आय एम

महिलेचा विनयभंग; कारवाई करा – एम आय एम

महिलेचा विनयभंग; कारवाई करा – एम आय एम

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड – लाकूड वाहतुक *करुन उदरनिर्वाह करणार्‍या महिलेला रस्त्या अडवून वनविभागाचे पोलिस असल्याचे *भासवून विनयभंग करणार्‍या आरोपींवर गुन्हा नोंदवून त्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी *एमआयएमच्या वाहतुक आघाडीचे विशाल वागमारे , शेख सलीम यांनी केली आहे*.
*पत्रकात म्हटले आहे की, वृक्षतोडबाबत शासनाकडून *मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. प्रत्येकाने वृक्ष लागवड *करणेे गरजेचे आहे. वृक्षतोड *करणार्‍यांवर कारवाई होत असतााना बीड तालुक्यात *वृक्षतोडीच्या नावाखाली* *व वृक्षमित्र असल्याचे सांगून काही भामटे महामार्गावर खंडणी वसुल करण्याचे काम करत आहेत*
*शहरातील जालना रोडवर 14 मे रोजी सायंकाळी असाच प्रकार उघडकीस आला. लाकडाच्या गाडीवर मुकादम म्हणून काम करुन उदरनिर्वाह करणार्‍या एका *महिलेलेचा ट्रक संभाजी सुर्वे, के.के.वडमारे व इतर दहा ते बारा जणांनी अडविला. आम्ही वनविभागाचे पोलिस आहोत असे सांगून ट्रक तपासण्याच्या *नावखाली सुर्वे व वडमारे आणि त्यांच्या साथीदारांनी ट्रक चालक, मजुर यांना मारहाण केली. मुकादम असलेल्या महिलेलाही मारहाण करुन तिचा विनयभंग *केला. सदर महिला बहुजन वंचित आघाडीची कार्यकर्ता आहे. घटनेची माहिती कळाल्यानंतर *एमआयएमचे नगरसेवक अमर शेख आणि पदाधिकार्‍यांनी अत्याचारग्रस्त महिलेला सोबत घेऊन शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून मारहाण व विनयभंग प्रकरणी तक्रार दिली. मात्र ठाण्यातील अधिकारी टाळाटाळ करत होते. दोन दिवस झाले या प्रकरणी *संभाजी सुर्वे, के.के.वडमारे व इतर दहा ते बाराजणांविरुध्द कसलीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे आरोपींवर विनयभंग, मारहाणीचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी *एमआयएमच्या वाहतुक आघाडीचे विशाल वागमारे , शेख सलीम*यांनी केली आहे*

Leave a Reply

Your email address will not be published.