Home » माझा बीड जिल्हा » बीड जिल्ह्याच्या राजकारणातील दादा..

बीड जिल्ह्याच्या राजकारणातील दादा..

बीड जिल्ह्याच्या राजकारणातील दादा..

डोंगरचा राजा  / आँनलाईन

बीड जिल्ह्याच्या राजकारणातील दादांशी.. उदय नागरगोजे यांनी साधला थेट संवाद..

जय भवानी कारखान्यावरील स्टेजसमोरच्या भव्य आवारात खेळणारी आम्ही पोरं… तेवढ्यात पांढरी शुभ्र अ‍ॅम्बेसेडर (निटसं आठवत नाही पण गाडीचा नंबर 2050 असाच काहीसा होता) हॉर्नचा आवाज करत कारखान्याच्या दिशेने धावलेली दिसायची… बहुतेकांच्या तोंडून ऐकच वाक्य… दादा आले… गेटवरील वॉचमनची पळापळ… एकजण गेट उघडायला धावायचा तर दुसरा अकाऊंट विभागाच्या दिशेने धावायचा… दादांची गाडी बहुतेकदा कार्यालयासमोरच उभा रहायची….वॉचमन दरवाजा उघडून दादा कार्यालयात जाऊपर्यंतच काय ते आमची नजर त्यांचा पाठलाग करायची…. पुन्हा आमचे क्रिकेट- हॉलीबॉल सुरु…. तास-अर्ध्या तासात पुन्हा एकदा सगळे कर्मचारी अलर्ट झाले की समजायचे… दादा कार्यालयाबाहेर येताहेत…. ज्या वेगाने गाडी आली… त्याच वेगाने पुन्हा निघायची….

दादा… लहानपण गढी कारखान्यावरच गेल्याने या नावाबद्दल आकर्षण… शिवाजीराव पंडित… जय भवानी कारखान्याचे संस्थापक… त्यांच्या दुरदृष्टीमुळेच गेवराई तालुक्यात शैक्षणिक क्रांती घडू शकली… नवोदयसारखे विद्यालय गढीला सुरु होऊ शकले… अशी एक ना अनेक कामे सांगता येतील… बालवयापासून ज्या नावाबाबत आकर्षण… आदरयुक्त भिती होती… त्या व्यक्तीला भेटण्याचा योग परवा लगड सरांमुळे आला…

जागतिक कुटूंबदिनानिमित्त एकत्र राहणार्‍या कुटूंबाविषयी बातमी करायची होती… रात्रीपासून विचार करत होतो… सकाळी अचानक पंडित कुटूंबाविषयी छान बातमी होऊ शकते असे वाटले… आमचे गुरु प्रा.लगड सरांना फोन केला आणि विषय सांगितला… थोड्या वेळात लगड सरांचा फोन आला आणि पंधरा मिनीटात दादांची भेट होऊ शकते लगेच ये असे म्हणाले… मी शक्यतो प्रश्‍न लिहून घेत नाही… परंतु दादांसमोर बोलतांना उगीच अडखळायला नको म्हणून प्रश्‍न लिहून घेतले…आणि शिवछत्रवर पोहचलो…. लगड सरांची भेट घेतली… थोड्याच वेळात दादा येतील म्हणून त्यांनी सांगितले… दादा येताच प्रथमतः सरांनी ओळख करुन दिली….दादांनी खुर्ची मागवून बसायला सांगितले… जागतिक कुटूंब दिनानिमित्त तुमची प्रतिक्रिया पाहिजे एवढे म्हणाल्यानंतर दादांनी संस्कार आणि नितीमत्ता पाहिजे… सर्व काही सुरळीत चालतं असं सांगितलं…. त्यानंतर दादांनी आपला जीवनप्रवास सांगत गेवराईच्या विकासाकरिता केलेले प्रयत्न… जनतेची मिळालेली साथ याविषयी मनमोकळा संवाद साधला… कुटूंबातील सर्व सदस्यांच्या मनमिळावू, प्रेमळ स्वभावामुळे आणि संस्कारामुळेच पंडित कुटूंब एकत्र नांदत असल्याचे सांगितले…

जिल्ह्याच्या राजकारणात मोठे वलय लाभलेल्या पंडित कुटूंबाचे प्रमुख असलेले दादा संपूर्ण गेवराई तालुका माझे कुटूंब असल्याचे सांगतात त्यावेळी त्यांचे गेवराईवरील प्रेम अधोरेखित होते… त्यांच्याशी साधलेला संवाद माझ्यासाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहे!

— उदय नागरगोजे,
जय भवानी कारखाना.
ह.मु.बीड!

Leave a Reply

Your email address will not be published.