Home » माझी वडवणी » कामगारांनी काढला पाटोदा तहसीलवर मोर्चा

कामगारांनी काढला पाटोदा तहसीलवर मोर्चा

कामगारांनी काढला पाटोदा तहसीलवर मोर्चा

अमोल जोशी / डोंगरचा राजा

पाटोदा –मोर्चाला तालुक्यातून कामगार मोठया संख्येने होते उपस्तीथ
पाटोदा- गोरगरीब बांधकाम मजूर यांना महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळ यांच्या तर्फे मिळणारे विविध योजनांच्या मागणीसाठी पाटोदा येथे दि.१६.मे गुरुवार रोजी पाटोदा तालुक्यातील इमारत बांधकाम व इतर कामगार ( बांधकाम मिस्तरी.बिगारी.खोदकाम मजूर, पेंटर,वेल्डर,पल्बंर सह अनेक कामगारांनी ११वाजता मोर्चाला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन या मोर्चास सुरुवात सुरवात केली व राजमोहमद चौक ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय येथे धडकुन सभेत रुपांतर झाले यावेळी तालुक्यातील राजाभाऊ देशमुख. दलीतमित्र अ.समद नबी,नय्युम पठाण नगरसेवक,सुदर्शन चव्हाण,नगरसेवक विजय जोशी,अॅड.जब्बार पठाण, उमर चाऊस,गणेश कवडे,नामदेव सानप,संदीप जाधव नगरसेवक,शेख जिलानी,शेख मुज्जु,तौसीफखान रितेश शर्मा यांनी बांधकाम मजुरांच्या बाबतीत आपले मनोगत व्यक्त करुन.मजुरांच्या मागण्या मान्य करा नसता तीव्र आंदोलन करू असा इशारा कामगारांनी दिला आहे .शासनाकडून गोरगरीब इमारत बांधकाम व इतर कामगारांना महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याण कारी मंडळ यांच्या तर्फे मिळणारे अनुदान तात्काळ वाटप करावे,
सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असून पाणी उपलब्ध नसल्याने बांधकामे पूर्ण बंद आहे ,यामुळे कामगार यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे.बीड मधे बांधकाम कामगार कार्यालयात आजपर्यंत ज्यांनी नावनोंदणी केली आहे व अनुदान मिळण्यासाठी अर्ज केला आहे त्यांना त्यांचे योजना त्वरीत देण्यात यावे, अशी कामगारांनी मागणी केली आहे .इमारत बांधकाम कामगारांना शासन स्तरावर दुष्काळामध्ये एखादया योजनेत घ्या ,हाताला काम द्या,कामगारांना सरसकट घरकुल द्या,कामगारांच्या विध्यार्थ्यांना शिषवृती द्या, कामगारांच्या पत्नीच्या प्रसुतीनंतर मिळाणारे अनुदान ,विवाहला मिळणारे अनुदान ज्यांचे नवीन विवाह झाले आहे आसे कामगारांना तात्काळ आनुदान वाटप करा.या मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आले आहेत.यावेळी सय्यद सलीम मिस्तरी, ,सय्यद अजीम, हमीद पठाण सयय्यद सज्जाद,अनिस मिस्तरी ,सय्यद इसाक,साहेबा मिस्तरी,शेख मशरोद्दीश,स.जलील ,फारुख मिस्तरी,फैय्याज पठाण,बडी मिस्तरी, जाहेद पठाण,जमीर सय्यद,पेंटर नागरगोजे. पेंटर महादु,शाबुद्दिन मिस्तरी,नदीम,फेरोज,लतिफ,युवराज,आप्पा मिस्तरी, रशीद मिस्तरी, सागर जावळे,गणेश जावळे,सय्यद गुड्डु ,सलमान मिस्तरी, फारूक,बाळु बोधने मिस्तरी,वाहेद मिस्तरी,बांधकाम व्यावसायिक,मजूर याच्यासह शेकडो कामगार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.