Home » माझा बीड जिल्हा » कामगारांच्या उद्या तहसीलवर मोर्चा ..

कामगारांच्या उद्या तहसीलवर मोर्चा ..

कामगारांच्या उद्या तहसीलवर मोर्चा ..

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

पाटोदा – गोरगरीब बांधकाम मजूर यांना महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याण कारी मंडळ यांच्या तर्फे मिळणारे अनुदान तात्काळ वाटप करा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी पाटोदा तालुक्यातील बांधकाम मिस्त्री ,कामगार, गवंडी, मजूर, यांनी पाटोदा तहसील कार्यालयावर उद्या दिनांक 16 मे गुरुवार सकाळी 10 वाजता मोर्चाचे आयोजन केले आहे शिवाजी चौकातुन या मोर्चास सुरुवात होणार आहे. शासनाकडून गोरगरीब बांधकाम व इतर मजूर यांना महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याण कारी मंडळ यांच्या तर्फे मिळणारे अनुदान तात्काळ वाटप करावे,
सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असून पाणी उपलब्ध नसल्याने बांधकामे पूर्ण बंद आहे त त्यामुळे सदर गवंडी बांधकाम मजूर यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे.बीड मधे बांधकाम कामगार कार्यालयात आजपर्यंत ज्यांनी नावनोंदणी केली आहे व अनुदान मिळण्यासाठी अर्ज केला आहे त्यांना त्यांचे अनुदान त्वरीत देण्यात यावे,अशी कामगारांची मागणी आहे बांधकाम मजूर,मिस्तरी,गवंडी, यांना शासन स्तरावर दुष्काळामध्ये एखादया योजनेत घ्या ,हाताला काम द्या, ह्या मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. सय्यद सलीम मिस्तारी, सय्यद अजीम मिस्त्री,हमीद पठाण,अनिस मिस्त्री,इसाक मिस्त्री,जलील मिस्त्री,आरीफ मिस्त्री,फैय्याज मिस्त्री,बडी मिस्त्री, जहेद मिस्त्री, बोराडे मिस्त्री,जाहीर मिस्त्री,नदीम,फेरोज,लतिफ,युवराज, आप्पा मिस्त्री,हमीद, बामदाळे, शाबु मिस्त्री,रज्जाक मिस्त्री,सलमान मिस्त्री, फारूक,तमिज मिस्त्री,वाहेद मिस्त्री,यांनी बांधकाम व्यावसायिक, मजूर यांनी या मोर्चास मोठया संख्येने उपस्तीथ रहावे असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.