Home » माझा बीड जिल्हा » पाणी टँकर अधिकार पं.स.द्या – अशोक डक

पाणी टँकर अधिकार पं.स.द्या – अशोक डक

पाणी टँकर अधिकार पं.स.द्या – अशोक डक — 

डोंगरचा राजा / आँनलाईन

– कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांची आग्रही मागणी.

माजलगाव – उन्हाची दाहकता प्रचंड वाढत असल्याने ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न जटील बनत चालला आहे. माजलगाव तालुक्यातील सुमारे 15 गावांना अद्याप टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात नसल्याचे चित्र आहे. दरम्यान या गावांना तात्काळ पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. अश्यावेळी संबंधित गावांना पाणी टँकर पुरवण्याचा अधिकार पंचायत समितीला देण्यात यावा अशी आग्रही मागणी माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी केली आहे.

अशोक डक यांनी याबाबत काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, माजलगाव तालुक्यात उन्हाळ्याच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत आहे. ऐन उन्हाळा सुरु असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. गेली दोन वर्षे पाऊसकाळ कमी झाल्याने पाण्याची टंचाई भिषण रूप धारण करत आहे. माजलगाव तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची पातळी खोल गेल्याने ग्रामस्थांनी पुणे, मुंबई, नाशिक व इतरत्र स्थलांतर करणे सुरू केले आहे. हे वास्तव नाकारता येत नाही यासाठी पंचायत समितीला पाण्याचे टँकर देण्याचा अधिकार देवून येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने सभापती अशोक डक यांनी केली आहे.
◾◾◾◾

*चारा छावण्यांचे काय झाले?*

सरकारने जनावरांच्या प्रश्नी चारा छावणीला नको तर दावणीला हवा भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर या भूमिकेचे पुढे काय झाले? असा संतप्त सवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी सरकारला विचारला आहे. दरम्यान तालुक्यात रोजगार हमीचेही कामे सुरू नसल्याने स्थानिक ग्रामस्थांना स्थालातर केल्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसून या प्रश्नी त्वरित पाऊले उचलावीत अशीही मागणी सभापती डक यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.