Home » माझी वडवणी » भाजप मुक्त अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करणार -वाकसे

भाजप मुक्त अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करणार -वाकसे

भाजप मुक्त अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करणार -वाकसे

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड — काँग्रेस राष्ट्रवादीसह धनगर समाजाची केवळ दिशाभूल केली तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ अशी घोषणा केली होती मात्र जवळपास पाच वर्ष पूर्ण होत आले आहेत अद्यापही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही भाजपने एकही धनगर समाजाला लोकसभेला जागा दिली नाही मग जयंतीच्या स्टेजवर भाजपच्या नेत्यांना का येऊ द्यायचं? धनगर समाज आंदोलनकर्ते त्यांच्यावर गुन्हे अद्यापही मागे घेण्यात आले नाही शेळी मेंढी महामंडळाला एक रुपयाचा फंड देण्यात आला धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती कधी देणार ? धनगर समाजाला आदिवासी सारख्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी देणार? ह्या फक्त घोषणा आहेत कागदोपत्री जीआर का नाही काढला? मेंढपाळांना शस्त्र परवाने कधी देणार? धनगर आरक्षण साठी शहीद झालेले मंजीत कोळेकर यांना तात्काळ 50 लाख रुपये देण्यात यावे .यासाठी अनेक आंदोलनं झाले मात्र अद्यापही त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली नाही.पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यासाठी संपूर्ण देशभरातील धनगर समाज येथे येतो जयंती भाजप वाल्यांनी हायजॅक बीजेपी वाल्याच भाषण धनगर समाजाला कळत नाही धनगर चौंडी हे बहुजन समाजाचे प्रेरणास्थान आहे यामुळे जयंती सोहळा एकाच पक्षाचा मंच होऊ न देता जयंती मध्ये भाजप च्या विचारसरणीची जयंती होऊ देणार नाही धनगर समाजाचे नेते गणपतराव देशमुख,दुग्धविकास मंत्री माधव जानकर साहेब,खासदार महात्मे ,जलसंधारण मंत्री राम शिंदे , रामराव वडकुते ,अण्णा डांगे ,गोपीचंद पडळकर,उत्तमराव जानकर , प्रकाश शेंडगे ,सुरेश कांबळे, किशोर भैया मासाळ, प्राजक्ता ताई कालगुंडे, दत्ता भरणे, विश्वासराव देवकाते ,जालिंदर अण्णा पिसाळ ,अर्जुन दादा सलगर ,नवनाथ पडळकर, डॉ यशपाल भिंगे ,कल्याणी वाघमोडे, हेमंत पाटील डॉक्टर इंद्रकुमार भिसे, निळकंठ गडदे, डॉ व्यकटेश चामनर, मुन्ना काळे, सभापती गणेश शिंदे,या सर्व नेत्यांनी एकत्र यावे भाजपचा एकही नेता होळकर अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या स्टेजवर दिसणार या सर्व धनगर समाजाच्या नेत्यांनी पक्ष गट विसरून धनगर आरक्षणासाठी एकत्र याव यासाठी मी लढत आहे असे आव्हान धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाध्यक्ष दत्ता वाकसे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे यावेळी त्यांच्या समवेत सुरेश कांबळे, राम शेठ लांडे ,बाळासाहेब तायडे सुरेश (पत्रकार )भावले, दत्ता वाकसे, जि प सदस्य जालिंदर पिसाळ गणपत काकडे दत्ताभाऊ पिसाळ ,अमोल भावले,जय निर्मळ, हरी केसभट विशाल पांढरे भगवान जराड आदी उपस्थित होते.
__
जो धनगर नेता राजकारण सोडून गटतट सोडून एकत्र येणार नाही त्या नेत्याला धनगर समाज रिंगणात घेईन/ वाकसे ..

Leave a Reply

Your email address will not be published.