मनरेगा व जलयुक्त शिवार योजनेतील कामे पूर्ण करा – जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय
डोंगरचा राजा /आँनलाईन
बीड – जिल्हयातील मनरेगाच्या माध्यमातून सेल्पवरील व सरु आलेली कामे त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेतील मंजूर कामे व अपूर्ण असलेली कामे तात्काळ हाती घेऊन ती कामे वेळेते पूर्ण करावीत,अशा सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
पाणी फाऊंडेशनचे महाराष्ट्र समन्वयक नामदेव ननावरे, मराठवाडा विभागीय समन्वयक संतोष शिनगारे, जिल्हा समन्वयक बिभिषन भोयटे, राहूल गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री पांण्डेय यांची भेट घेतली. त्यावेळी चर्चा करतांना ते बोलत होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, मनरेगाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामे हाती घेवून ती पूर्ण करावीत. तसेच जलयुक्त शिवार योजनेची मंजूर व अपूर्ण असलेली कामे 22 मे पर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जिल्हयात ज्या गावांनी पाणी फाऊंडेशनमध्ये सहभाग घेतला आहे. त्या गावातील गावकऱ्यांचे चांगले सहकार्य मिळाल्यामुळे त्या गावामध्ये जलसंधारणाची चांगली कामे झाली आहेत. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्यां गावांना डिझेलवरील खर्च भागविण्यासाठी 1 लाख 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी पाणी फाऊंडेशनमध्ये सहभाग घेतलेल्या गावांतील पाणी फाऊंडेशनच्या कामामध्ये गावकऱ्यांनी आपले योगदान देऊन श्रमदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी केले. तसेच शासनाच्या विविध विभागांनी गावे दत्तक घ्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.