Home » महाराष्ट्र माझा » भरतबुवा रामदासी यांना कीर्तनाचार्य पुरस्कार..!

भरतबुवा रामदासी यांना कीर्तनाचार्य पुरस्कार..!

भरतबुवा रामदासी यांना कीर्तनाचार्य पुरस्कार..!

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड — येथील प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.
*भरतबुवा रामदासी* यांना चाळीस वर्षे निष्ठेने करीत असणाऱ्या कीर्तन सेवेबद्दल श्री स्वामी समर्थ सेवा संस्था*
*ता. दौंड जि. पुणे* या संस्थेच्या वतीने *दि. ०२।०५।२०१९* रोजी मा. आ. राहूल कुल, सौ. कांचनताई कूल, मोहटादेवी संस्थानचे सीईओ सुरेश भणगे, दौंड अर्बन बँकेचे चेअरमन प्रेमसुख कटारिया, संस्थानचे अध्यक्ष वैभव महाराज कांबळे, बाळकृष्ण साळुंखे, श्रीधर गोलांडे व अष्टमहालक्ष्मी महायागातील सर्व वैदिक ब्रह्मवृंदांच्या हस्ते *कीर्तनाचार्य* पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुष्पहार, महावस्त्र, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व मानधन देऊन *ह.भ.प. भरतबुवा* *रामदासी* यांना गौरविण्यात आले. *ह.भ.प. भरतबुवा* *रामदासी* यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर जवळपास अकरा हजारांहून अधिक कीर्तने केली. कीर्तन शिबीरांच्या माध्यमातून अनेक तरुणांना कीर्तनाचे प्रशिक्षण दिले. राज्यात अनेक शहरांतून राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवांचे आयोजन केले. अनेक ग्रामीण भागात ज्ञानेश्वरी पारायण, दासबोध पारायण, गाथापारायण ,भागवतकथा, रामकथा करून समाज प्रबोधनाचे कार्य केले. कीर्तन क्षेत्रातील त्यांच्या या असामान्य कार्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी अनेक मान्यवरांनी *भरतबुवा रामदासी* यांच्या कार्याचा गुणगौरव केला. यावेळी शहरांतील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. *भरतबुवा रामदासी* यांना राज्यातील अनेक मान्यवर संस्थांकडून १५० च्या वर पुरस्कार देण्यात आले आहेत.
आमदार राहूल कुल यावेळी बोलतांना म्हणाले की, कीर्तन परंपरेतून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महाराजांनी राज्यभर बीड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published.