Home » क्राईम स्टोरी » छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या..

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या..

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या..

डोंगरचा राजा / ऑनलाइन

▪ पट्टीवडगाव येथील घटना; दोघांवर गुन्हा.

अंबाजोगाई – सततच्या छेडछाडीला कंटाळुन व मानसिकरित्या त्रस्त झालेल्या दहावीच्या विद्यार्थिनीने रविवार रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे उघडकीस आली. याप्रकरणी दोन तरुणांवर विनयभंग आणि पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

वैष्णवी अशोक लव्हारे (वय १६, रा. पट्टीवडगाव, ता. अंबाजोगाई) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. नुकतीच तिने दहावीची परीक्षा दिली होती. तिच्या गावातील अमित साहेबराव माने (वय १९) याने रोहन गोविंद फड (वय १९) याच्या मदतीने संगनमताने वैष्णवी सोबत जवळीकता साधत तिच्या घराकडे सातत्याने दुचाकीवरून चकरा मारून पाठलाग केला आणि तिचा विनयभंग केला. या ओद्नही तरुणांनी वैष्णवी आणि तिच्या वडिलांना धमक्या देत मानसिक त्रास देखील दिला. अखेर या त्रासाला कंटाळून वैष्णवीने रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घरातील पत्र्याच्या आडुला गळफास घेतला. ही घटना लक्षात येताच वैष्णवीच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने खाली उतरवून स्वाराती रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले असे वैष्णवीचे वडील अशोक अंबाजी लव्हारे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात अमित माने आणि रोहन फड या दोघांवर विनयभंग आणि पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आये. पुढील तपास सहा. पोलिस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार बाळासाहेब मुळे हे करत असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.