Home » ब्रेकिंग न्यूज » राष्ट्रीय पक्षी मोर.. कोरड्या विहीरीत पडला.

राष्ट्रीय पक्षी मोर.. कोरड्या विहीरीत पडला.

राष्ट्रीय पक्षी मोर.. कोरड्या विहीरीत पडला.

डोंगरचा राजा/आँनलाईन

— कोरड्या विहिरीत पडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोरास दिले जीवदान

— पुसरा येथील तरूणांनी घडविले माणुसकीचे दर्शन

— पाणीवटे करणे वन्य प्राण्यासाठी काळाची गरज

वडवणी — घोटभर पाण्यासाठी पुसरा शिवारात भटकंती करणारा राष्ट्रीय पक्षी मोर महादेव नाईकवाडे यांच्या पन्नास फूट खोल असलेल्या कोरड्या विहिरीत पडलेल्याची घटना आज सकाळी 6 वाजता पुसरा येथे घडली.याची माहीती गावातील तरूणांना मिळताच मोरास स्थानिक तरुणांनी दोरीच्या सहाय्याने बाहेर काढत जीवदान दिले.पाण्याच्या शोधात हा मोर विहिरीत पडला असावा,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.वडवणी पोलीस स्टेशनचे एपीआय सुरेश खाडे यांच्या सहकार्याने वन परीक्षेत्र अधिकारी आर.बी.मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग कर्मचारी पारवेसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोराला ताब्यात घेतले. त्यानंतर वनविभागाच्या उद्यानात आणून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.जखमी मोराला गोरक्षनाथ टेकडीवरील वन उद्यानात ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वनविभागाचे पारवे यांनी सांगितले.
वडवणी पासुन सात कि.मी.अंतरावर असलेल्या पुसरा शिवारात हरीण, मोर, ससे यांसह इतर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत.सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने उन्हाचा पारा ४५ अंशांपर्यंत गेला आहे.परिसरातील नदी-नाले कोरडे पडले आहेत.वनविभागाच्या क्षेत्रात वन्य प्राण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही.त्यामुळे पाण्यासाठी आसुसलेले वन्यजीव पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने येत आहेत. आज सकाळी ६ च्या दरम्यान २० ते २५ मोरांचा कळप पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने भटकंती करत फिरत आसताना पुसरा येथील शेतकरी महादेव नाईकवाडे यांच्या ५० फुट कोरड्या विहीरीत एक मोर पडुन जखमी झाला.याची माहीती शेतकरी महादेव नाईकवाडे यांनी गावातील पञकार अविनाश मुजमुले यांना देताच त्यांनी तातडीने यंञणा राबवुन एपीआय सुरेश खाडे यांच्या मदतीने वनविभागाला माहिती देत घटनास्थळी तात्काळ भेट दिली.दोरीच्या साह्याने गावातील ग्रामपंचायत सदस्य समाधान झोडगे विहीरीत उतरले मोराला बाहेर काढुन जिवदान देऊन माणुसकीचे दर्शन घडवुण आणले.यावेळी गावातील पञकार अविनाश मुजमुले,चेअरमन लक्ष्मण जोगदंड,ग्रा.सदस्य समाधान झोडगे,शेतकरी महादेव नाईकवाडे,अंकुश नाईकवाडे, बंडु मुजमुले,विठ्ठल नाईकवाडे, सचिन नाईकवाडे,अनिल मुजमुले,महादेव मुजमुले,सह आदीने मोलाचे सहकार्य केले. वनविभाग कर्मचारी पारवे यांनी मोराला ताब्यात घेऊन प्राथमिक उपचार करून धारूर वनपरिक्षेञ कार्यलय अंतर्गत असलेल्या गोरक्षनाथ टेकडी येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. पुसरा परिसरातील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे वन्यजीव पाण्यासाठी भटकंती करीत आहेत.वनविभागाने अशा तहानलेल्या जिवांसाठी परिसरात पाणवठे तयार करावेत अशी मागणी पुसरा व परिसरातून होत आहे.
“”””””””””””””””””””””””””””””””””””
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
चौकट
प्राण्यासाठी पाणीवटे करणे गरजेचे
“”””””””””””””””””””””””””””””””””””
सध्या तालुक्यात दुष्काळ पडल्याने पुसरा शिवारात व परिसरातील नदी-नाले कोरडे पडले आहेत.हरीण,मोर,ससे यांसह इतर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहे.घोटभर प्राण्यासाठी वणवण भटंकती करत आहेत.गेल्या महिन्यात देखील आम्ही हरिण वाचविले होते, व आत्ता आम्ही मोर वाचविला आहे.त्यामुळे वनविभाने तात्काळ परिसरातील वन्य प्राण्यासाठी पाणीवटे बांधुन पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे बनले आहे.
“””””””””””””अविनाश मुजमुले ग्रा.प.सदस्य पुसरा

Leave a Reply

Your email address will not be published.