Home » माझा बीड जिल्हा » चारा छावण्यांना अचानक भेट —

चारा छावण्यांना अचानक भेट —

चारा छावण्यांना अचानक भेट —

डोंगरचा राजा/आँनलाईन —

— जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांची मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या सह चारा छावण्यांना अचानक भेट

बीड -जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी मलकाची वाडी , खोकरमोहा , रायमोहा आव्हळवाडी , शिरूर , तांबा, राजुरी पाटोदा येथील छावणीस सर भेट देऊन पाहणी केली . यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अमोल येडगे हे होते. जिल्हाधिकारी श्री पाण्डेय यांनी यावेळी जनावरांचे मालक व शेतकरी यांच्याशी संवाद साधला .
त्यांनी जनावरांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा , चारा, खाद्य आदींबाबत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यांना येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या.
यावेळी त्यांनी छावणी चालकांकडून ठेवण्यात येणाऱ्या नोंदींची कागदपत्रे तपासणी केली तसेच जनावरांना देण्यात येणाऱ्या पेंड व पशु खाद्याचे नमुने ताब्यात घेतले. यावेळी चारा छावण्या चालकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
जनावरांना द्यावयाचा चारा , गोळी पेंड व खाद्य हे नियमित दिले जात नसल्याचे दिसून आले. तीन चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या प्रत्यक्षात पेक्षा 30ने कमी असल्याचे आढळून आले. नायब तहसीलदार यांच्या पथकासह केलेल्या तपासणी मध्ये हे पहिल्यांदा दोषी आढळल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तसेच सदर चारा छावण्या जर नंतर दुसऱ्यांना दोषी आढळल्यास त्यांची मान्यता रद्द केलीे जाईल असे जिल्हाधिकारी श्री पाण्डेय यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.