Home » माझी वडवणी » आत्मसन्मानाची वागणूक द्यावी – तोकले

आत्मसन्मानाची वागणूक द्यावी – तोकले

आत्मसन्मानाची वागणूक द्यावी – तोकले

डोंगरचा राजा / आँनलाईन

अंबाजोगाई — महिलांनी गुलामगिरीतून बाहेर पडले पाहिजे . माहिलांना आत्मसन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे , मुलींना आत्मसन्मानासाठी शिक्षण दीले पाहीजे. असे
प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मनिषा तोकले यांनी व्यक्त केले .
योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी व श्रीमती कमल खुरसाळे स्मृती न्यास यांच्यावतीने आयोजित महिला आत्मभान
शिबीरात गुरुवारी त्या बोलत होत्या . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष कमलाकर चौसाळकर होते .
मनिषा तोकले म्हणाल्या , अनेक माहिलांचे गर्भाशय काढल्याचे उघडकीस आले आहे . ते चुकीचे आहे .महीलांच्या शरीरावर त्यांचा अधिकार असला पाहीजे.महिलाना संपती मध्ये समान अधिकार असावा . त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे .हे सर्व मिळवण्यासाठी महीला व मुली सक्षम झाल्या पाहीजेत.शिक्षण हे सक्षमी करण करते. शिक्षणासोबतच अशा प्रकारच्या शिबीराची सुध्दा गरज आहे.असे मनिषा तोकले आपल्या व्याखानात म्हणाल्या.
कमलाकर चौसाळकर यांनी अध्यक्षीय समारोप केला .
सुरुवातीला मुख्याध्यापिका वर्षा जालनेकर यांनी मनिषा तोकले, अशोक तांगडे, तत्वशिल कांबळे यांचे स्वागत केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी खाडे यांनी केले . शेवटी स्नेहा जाधव यांनी सर्वांचे आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published.