Home » माझा बीड जिल्हा » अँड.देशमुख यांची ‘लवाद प्राधिकारी’ पदावर..

अँड.देशमुख यांची ‘लवाद प्राधिकारी’ पदावर..

अँड.देशमुख यांची ‘लवाद प्राधिकारी’ पदावर..

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड — केंद्र शासनाच्या अखत्यारीतील बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या संदर्भातील वाद चालवण्यासाठी आणि निर्णय देण्यासाठी बीड येथील अँड. अजित एम. देशमुख यांची “लवाद प्राधिकारी” या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था श्री. सतीश सोनी यांनी अँड. अजित देशमुख यांना ” लवाद प्राधिकरण ” प्रत्यक्ष चालू करण्यासाठी मान्यता दिली आहे. अँड. देशमुख बीड जिल्ह्यातील पहिले लवाद ठरले आहेत.

बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम २००२ मधील तरतुदींप्रमाणे ही नियुक्ती झाली आहे. या कायद्यासह लवाद आणि समेट घडवून आणण्याचा कायदा १९९६ आणि अन्य कायद्याप्रमाणे हे कामकाज चालते. सरकारने या संदर्भात एक पॅनल तयार केले आहे. यापैकी अँड. देशमुख यांना प्रत्यक्ष काम चालू करण्याबाबत आदेश देण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी आणि सहकार मंत्रालयाच्या आदेशाने आणि अखत्यारीत ही नियुक्ती झाली आहे. कसल्याही आणि कुठल्याही शिफारशी शिवाय केवळ गुणवत्तेच्या बळावर ही नियुक्ती झाली आहे. केंद्राच्या आदेशानंतर राज्य सरकारने तयार केलेल्या या पॅनलला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

बहुराज्यीय सहकारी संस्थांचे प्रमाण राज्यभरात मोठे आहे. या संस्थांच्या बाबतीतील संघटनात्मक, कायदे विषयक, आर्थिक आणि वसुली संदर्भातील वाद आता अँड. अजित देशमुख यांच्या लवाद प्राधिकरणात चालतील. यासाठी महाराष्ट्र राज्य हे कार्यक्षेत्र आहे. या लवाद प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयावर जर कोणत्याही वादी, प्रतिवादीला अपील करावयाचे असेल तर ते थेट मा. जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात करण्याची तरतूद आहे.

त्याच प्रमाणे लवादाने दिलेले काही निर्णय असे असतात की, त्या निर्णयाला कोणत्याही न्यायालयात आव्हानीत करता येत नाही. त्यामुळे हे निर्णय महत्वाचे ठरतात.जिल्ह्यातील संस्थांना यापूर्वी बुलढाणा, अमरावती, जळगाव आणि अहमदनगर येथील लवादांकडे या कामासाठी जावे लागत होते.

अँड. अजित देशमुख यांच्या निवडीबद्दल अँड. सुभाष शिंदे, अँड. बाळासाहेब इंगळे, (अंबाजोगाई), गोवर्धन मस्के, डॉ. भगीरथ बांड, अँड. विजय धांडे, अँड. रविंद्र किर्दत, राजेंद्र काळकुटे, भास्करराव पाटील, अँड. लिंबराज लाखे, अँड. प्रवीण नेहरकर, अँड. गिरीष कुलथे, नवनाथ नाईकवाडे, बलभीम बजगुडे, शेख यासिन पाशा, रणजित चव्हाण (आष्टी), यांचेसह अनेक अधिकारी मित्रमंडळाने आणि हितचिंतकांनी अँड. देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.