पाटोद्याचा सुपुत्र शेख तोसिफ शहीद.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
नक्षलवादी हल्ल्यात पाटोद्याचा सुपुत्र शेख तोसिफ शहीद.
आज १ मे महाराष्ट्र दिन रोजी गडचिरोली ज़िलल्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा जवळील लेंढारी नाल्याजवळ नक्षल्यांनी स्फोटात पोलिसांचे वाहन उडवून दिले. या हल्ल्यात जलद प्रतिसाद दलाचे १५ जवान शहीद झाले. तसेच खासगी वाहनाचा चालकसुध्दा या घटनेत मृत्यूमुखी पडला आहे.
या स्फोटात पाटोदा येथील जवान शेख तोसिफ आरिफ या जवानाला वीरमरण आले असून या दुदैवी घटनेने पाटोदा शहरावर शोककळा पसरली आहे.शहरातील क्रांतीनगर भागात ते राहतात शेख तोसिफ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी , आई ,वडील ,भाऊ असा परिवार आहे