Home » माझा बीड जिल्हा » मध्यरात्री प्रकार घडल्याने गावकरी भयभीत!

मध्यरात्री प्रकार घडल्याने गावकरी भयभीत!

मध्यरात्री प्रकार घडल्याने गावकरी भयभीत!

डोंगरचा राजा / आँनलाईन
अंबाजोगाई तालुक्यात साकुड व वरवटी येथे
पिसाळलेल्या कुत्र्याने वरवाठी गावात तब्बल 22 जणांवर हल्ला करत त्यांचा चावा घेतल्याची घटना घडली आहे. रात्री झोपलेल्या नागरिकांवर कुत्र्याने हल्ला केला . यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .जखमींना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले आहेत. दरम्यान,नंदकिशोर मुंदडा यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली . तातडीने लस उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या आहेत , अंबाजोगाई शहारासह तालुक्यात बेवारस ,मोकाट कुत्रे प्रचंड मोठी संख्या वाढली आहे , तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे .

कुत्रे मारण्यास बंदी असल्यामुळे पाळीव पेक्षा बेवारस मोकाट कुत्रे प्रचंड मोठी संख्या वाढली आहे , शहारासह तालुक्यात शेकडो बेवारस मोकाट कुत्रे आहेत त्यामुळे सर्व सामान्य माणसाच्या जीवावर बेतले जात आहे , काही वर्षांपूर्वी खोलेश्र्वर मंदीर परिसरात मोकाट कुत्र्यांनी एका मुलावर जीवघेणा हल्ला केला होता. तर आता साकुड , वरवठी गाव परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 22 जणांना चावा घेतला, जखमींना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. ही घटना कळताच मुंदडा अक्षय , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी रुग्णांची भेट घेतली व तातडीने रुग्णाना लस उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. त्यातील 10 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.