Home » माझा बीड जिल्हा » परशुराम जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रम

परशुराम जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रम

परशुराम जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रम

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

बीड शहरात भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन.

बीड- भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा यंदा अविस्मरणीय करण्यात येणार असून विविध सामाजिक,धार्मिक कार्यक्रमा सोबतच भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात येणार असल्याचा संकल्प दत्तमंदिर येथे झालेल्या व्यापक बैठकीत परशुराम भक्तांनी केला आहे. या बैठकीत तरुण पिढीला संधी देत समितीच्या अध्यक्षपदी घनश्याम भोगे यांची तर सचिव पदी अनिकेत हरी यांची निवड करण्यात आली आहे.

बीड शहरात गेल्या काही वर्षांपासून भगवान परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा ७ मे मंगळवार रोजी होणार आहे. हा सोहळा भव्यदिव्य आणि विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात यावा अशी सर्वाचीच इच्छा आहे. त्यासाठी श्री दत्तमंदिर येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीस मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीत भगवान परशुराम जन्मोत्सवा निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्याच बरोबर भव्यदिव्य अशी शोभायात्रा बीड शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार आहे. यासाठी समाजबांधवानी यात सक्रिय सहभाग नोंदवून हा सोहळा भव्यदिव्य करणार असल्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला तर जन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी तरुणांना संधी देत अध्यक्षपदी घनश्याम भोगे यांची तर सचिवपदी अनिकेत हरी, उपाध्यक्ष प्रशांत रामदासी,सहसचिव अनिकेत कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.बाकी या सोहळ्यात प्रत्येक बांधव हा एक समाजाचा सेवक,कार्यकर्ता म्हणून हा सोहळा पार पाडण्यासाठी आपले योगदान देणार आहे. बैठकीस महेश वाघमारे, प्रमोद कुलकर्णी, प्रमोद पुसरेकर, अमोल कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, अशोका कुलकर्णी, चंद्रकांत जोशी, अमोल आगवान, विकास उमापूरकर, अभय पटवारी,प्रेरक वैद्य, रोहित कुलकर्णी, नितेश कुलकर्णी, सुहास देशमुख यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.