Home » माझा बीड जिल्हा » दुष्काळी परिस्थितीत उपाययोजना कराव्यात – गोयल

दुष्काळी परिस्थितीत उपाययोजना कराव्यात – गोयल

दुष्काळी परिस्थितीत उपाययोजना कराव्यात – गोयल
डोंगरचा राजा/आँनलाईन
बीड – दुष्काळी परिस्थितीमध्ये राज्यात सर्वात जास्त अडचणींचा सामना बीड जिल्हयाला होत असून जिल्हयातील जनतेला पाणी पुरविण्यासाठी सर्वकष उपाययोजना कराव्यात असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. श्यामलाल गोयल यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात श्री. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर, उपजिल्हाधिकारी हरिच्छंद्र गवळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल भोकरे, सर्व गटविकास अधिकारी,नगर परिषदांचे मुख्याधिकारी आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत यावेळी तालुका निहाय पाण्याचे स्त्रोत,टॅकरने पाणी पुरवठयाचे नियोजन,अधिग्रहन,पाण्याचे स्त्रोत असल्यास पर्यायी स्त्रोत आणि विविध उपाययोजनांची माहिती घेण्यात आली.
जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी सांगितले की आष्टी,पाटोदा व शिरुर हे तालुके इतर भागापेक्षा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने जल उपलब्धता कमी आहे. लगतच्या अहमदनगर जिल्हयातील नजीकचे जलस्त्रोतातून पाणी उपलब्ध होण्यासाठी तेथील जिल्हाधिका-यांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. येडगे यांनी जनतेला पाणी उपलब्ध होण्यासाठी खाजगी अधिग्रहणाबरोबर मेहकरी,सीना,माजलगाव येथील बंधा-यामध्ये कुकडी,जायकवाडी येथून पाणी मिळण्यासाठी विभागीय आयुक्तांमार्फत मंजूरी घेतली जात असल्याचे सांगितले.
यावेळी केज,अंबाजोगाई,धारूर,परळी,आष्टी,,शिरुर,गेवराई,माजलगाव,वडवणी आदी तालुक्यांचे गटविकास अधिकारी आणि नगर परिषदातील पाणी पुरवठयाच्या नियोजनाबद्दल मुख्यधिकारी यांनी माहिती दिली.
यावेळी जनावरांसाठी देखील पाणी उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना आखाव्यात असे सांगताना पाणी सुरु असणा-या योजनांसाठी वीज कायम स्वरुपी खंडीत असल्यास 5 टक्के बील भरुन तात्पुरत्या स्वरुपात विज पुरवठा सुरु करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच अधिग्रहनाच्या खर्च रकमा लगेच अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
*******
वृत्त क्र.207
ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोगारांसाठी
मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

बीड,दि,26:- (जिमाका) भारतीय स्टेट बॅक,ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था बीड यांच्या वतीने ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी दि. 2 मे 2019 ते 31 मे 2019 या कालावधीत मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. अटी व नियम पुढीलप्रमाणे आहेत.
उमेदवार हा सुशिक्षीत बेरोजगार असावा,त्याचे शिक्षण सुरु नसावे, शैक्षणिक पात्रता किमान 8 वी उतीर्ण असावा, कुंटुंबाचे दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव असावे, उमेदवार ग्रामीण भागातील रहिवासी असावा, उमेदवाराचे वय किमान 18 ते 45 वर्षे असावे, प्रशिक्षणार्थ्यास व्यवसाय करण्याची आवड असावी, प्रशिक्षणासाठी कमाल 35 उमेदवारांची उपस्थिती आवश्यक आहे. प्रशिक्षणाचे अर्ज सर्व विस्तार अधिकारी, तालुका पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय बीड व प्रशिक्षण संस्था एस.पी. ऑफीससमोर, भारतीय स्य्टेट बँक, शिवाजी नगर शाखेच्या वर बीड येथे उपलब्ध आहे. प्रशिक्षणार्थ्याची निवड ही मुलाखतीव्दारे करण्यात येईल. प्रशिक्षण हे पूर्णपणे मोफत व निवासी आहे. प्रशिक्षणर्थ्याची राहण्याची,नाष्टा,3 वेळा चहा, 2 वेळा जेवणाची व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. प्रशिक्षण दरम्यान उमेदवाराला योग प्रशिक्षण, व्यक्तीमत्व विकास याचे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण दरम्यान तज्ज्ञ शिक्षक, यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यास व्यवसाय सुरु करण्यासाठी दोन वर्षे मार्गदर्शन व पाठपुरावा करण्यात येईल. वरील अटी पूर्ण करणा-या उमेदवारांनी दि. 29 एप्रिल 2019 पूर्वी अर्ज सादर करुन प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा,असे आवाहन भारतीय स्टेट बँकेचे संचालक व ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था बीड यांनी केले आहे. *********

Leave a Reply

Your email address will not be published.