Home » माझा बीड जिल्हा » संत-महंतांच्या उपस्थितीत सामुदायीक उपनयन सोहळा

संत-महंतांच्या उपस्थितीत सामुदायीक उपनयन सोहळा

संत-महंतांच्या उपस्थितीत सामुदायीक उपनयन सोहळा
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
बीड- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित सामुदायिक उपनयन सोहळास संत- महंत आणि समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. या सोहळ्यास राजकीय व्यक्ती सोबतच प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थितीत राहून बटुना शुभेच्छा दिल्या. अतिशय नियोजनबद्ध असा हा सामुदायीक उपनयन सोहळा अतिशय उत्साहात सपन्न झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या सोहळ्याची तयारी करण्यात येत होती.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी सामुदायीक उपनयन सोहळ्याचे आयोजन येथील रविराज मंगल कार्यालय येथे मंगळवार दि. २४ एप्रिल रोजी करण्यात आले होते. सद्गुरू ह.भ.प.वसंत महाराज कोरडे,पिंपळनेर गणपती संस्थान, यांच्या शुभाशीर्वादाने या सोहळ्यास सुरवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविताताई गोल्हार, सारणीकर महाराज, मोहनबुआ ऋषि, नगर परिषद उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर,नामदेवराव क्षीरसागर, अशोकराव देशमुख, प्रा.किशोर काळे, नगर सेवक जगदीश गुरखुदे, राजेंद्र काळे नगरसेवक विजय जोशी यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीस बटुची भव्य मुरवणूक काढण्यात आल्यानंतर मंत्रघोष उपनयन सोहळा पार पडला. महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी,एड.समीर पाटोदकर,एड.नरेंद्र होळकर, अशोकदेवा कडेकर, अमोल आगवान, बाळासाहेब जोशी, अमोल कुलकर्णी, अशोका कुलकर्णी,कृष्णा वांगीकर,अक्षय भालेराव, सतीश कुलकर्णी,नितेशकुमार कुलकर्णी,विनायक वझे,राजकुमार कुलकर्णी,बलुदेवा मुले,श्याम निर्मळ,अनिल देवा कुलकर्णी, दीपक कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.सूत्रसंचालन व आभार प्रमोद पुसरेकर यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.