Home » महाराष्ट्र माझा » छावणीत बीड जिल्हा आघाडीवर – अँड.देशमुख

छावणीत बीड जिल्हा आघाडीवर – अँड.देशमुख

छावणीत बीड जिल्हा आघाडीवर – अँड.देशमुख

डोंगरचा राजा / आँनलाईन
— राज्यातील एक हजार चौऱ्यांशी पैकी पाचशे एक्यांनाव चारा छावण्या एकट्या बीड जिल्ह्यात

— शेतकरी छावणी चालकाच्या दबावात

— नोटीस कशाला ? ठोस कारवाई करा

बीड — पावसाळ्यात पावसाने धोका दिल्याने राज्यातील काही जिल्ह्यात पाणीटंचाई मुळे दुष्काळ निर्माण झाला आहे. नऊ जिल्ह्यात एक हजार चौऱ्यांशी चारा छावण्या चालू आहेत. त्यातील मराठवाड्यात सहाशे चौसष्ट छावण्या आहेत. एकूण एक हजार चौऱ्यांशी पैकी पाचशे एक्यांनाव चारा छावण्या बीड जिल्ह्यात आहे. मात्र प्रशासनाचा धाक नसल्याने व छावण्या बारकाईने तपासल्या जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या छावणीतील शेतकरी छावणी चालकाच्या दबावात आहे, असे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

जनावरांच्या चारा पाण्याची परिस्थिती बिकट झालेली आहे. चारा छावण्या दुष्काळी भागात शेतकऱ्यांना आधार करतील असे चित्र होते. मात्र प्रत्यक्षात जवळपास सर्व छावण्यांमध्ये जनावरांना पूर्ण सुविधा मिळत नसल्याने छावण्यातही शेतकऱ्यांना आधार मिळतो का ? हा चर्चेचा विषय होत आहे.

राज्यात सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर सह मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी सह बीड जिल्ह्यात छावण्या उघडून त्या चालू केल्या आहेत. मात्र निवडणुकीत प्रशासन व्यस्त दाखवत असल्याने छावण्यांवर नियंत्रण राहिलेच नव्हते.

बीड जिल्ह्यात पाचशे एक्यांनाव पैकी तिनशे एक्कावन्न चारा छावणी चालकांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. त्रुटी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यात दिला गेला आहे. त्रुटी होत्या म्हणूनच नोटिसा निघाल्या. त्यामुळे आता ठोस आणि सडेतोड कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा नोटिसा देखील काही लोकांसाठी कमाईचे साधन होऊ शकते. यातून छावणी चालकांची पिळवणूक झाली तर जनावरांचे पुन्हा हाल वाढतील.

जिल्ह्यात सर्वत्र चारा छावण्यांतील जनावरांचे हाल आहेत. एक तर कुटुंब घरी आणि छावणीतील जनावरांच्या जवळ कुटुंब कर्ता अडकून पडलेला आहे. त्यामुळे जनावरा बरोबरच शेतकरी कुटुंबांनाही तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. त्यातच छावण्यातील अनागोंदीने जनावरांच्या जीवाला जेवढा त्रास होत आहे, त्यापेक्षा जास्त वेदना शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत आहेत. याचा सर्व स्तरातून गांभीर्याने विचार झाला पाहिजे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सर्व सुविधा देऊन आधार दिला गेला पाहिजे, असे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

चौकट…
जिल्हाधिकाऱ्यांनी तिनशे एक्कावन्न चारा छावण्यांना नोटिसा बजावून खुलासा मागविल्याच्या बातम्या छापून आल्या आहेत. दोष आढळले म्हणून नोटिसा बजावल्या, आता खुलासा कशाला ? या नोटिसा काही लोकांसाठी पुन्हा कुरणं ठरू शकतील. छावणी चालकांची यातून पिळवणूक झाली तर जनावरे पुन्हा पिळल्या जातील. हे पाप माथी घेऊ नका. त्यामुळे सडेतोड आणि ठोस कारवाई ताबडतोब करा, अन्यथा आंदोलन पुकारू, असा ईशारा अँड. अजित देशमुख यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.