मतदान सुरू,मतदारांमध्ये उत्साह..
डोंगरचा राजा / आँनलाईन
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी 18 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता सुरवात झाली,जिल्ह्यातील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र पहायला मिळाले .
बीड जिल्ह्यात तब्बल 20 लाख 43 हजार मतदार असून भाजपच्या डॉ प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी चे बजरंग सोनवणे यांच्यात मुख्य लढत होत आहे .प्रचाराच्या तोफा थंडवल्यानंतर गुरुवारी मतदान प्रक्रियेस सुरवात झाली .सकाळपासूनच बीड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.