भाई थावरे यांचा राष्ट्रवादीला पाठिंबा.
डोंगरचा राजा / आँनलाईन
भाजप सरकारने संपुर्ण कर्जमाफी केली नाही,त्यांच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी नाही त्यामुळे भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य भाई गंगाभीषण थावरे यांनी निवडणुकीच्या एक दिवस आगोदार पत्रकार परिषद घेऊन रा कॉ चे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे .त्यामुळे भाजप साठी धक्का समजला जात आहे.
शेतकरी चळवळीचे नेते असलेले भाई गंगाभीषण थावरे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनासाथ देत भाजप मध्ये प्रवेश करून पात्रुड सर्कल मधून जि प ची निवडणूक जिकली होती. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या निधना नंतर भाजप पासून अलिप्ततेचे धोरण स्वीकारले होते.
भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्याची कर्ज माफी केली नाही, तुरीला ,उसाला योग्य हमी भाव दिला नाही तसेच निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेखा केला नाही परंतु काँगेसच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत रा कॉ चे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी शेतकरी संघर्ष समिती चा पाठिंबा दिल्याचे भाई गंगांभीषण थावरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.