Home » देश-विदेश » मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी भाजपशी युती करावी-ना.आठवले

मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी भाजपशी युती करावी-ना.आठवले

मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी भाजपशी युती करावी-ना.आठवले

डोंगरचा राजा / आँनलाईन

बेंगळुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमार स्वामी हे काँग्रेसवर नाराज आहेत.त्यांनी कर्नाटकच्या विकासासाठी केंद्रात जे सत्तेत येऊ शकतात अश्या भाजपशी युती करावी. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव होणार आहे.त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसशी युती तोडून जनता दल (संयुक्त ) ने भाजपशी युती करून एनडीए मध्ये यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमार स्वामी यांना केले. कर्नाटक मधील चिक्कबल्लापूर येथे भाजप चे उमेदवार सत्य गौडा यांच्या जाहीर प्रचार सभेत ना रामदास आठवले बोलत होते.

कर्नाटकात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात रिपब्लिकन पक्षाचे 4 उमेदवार निवडणूक लढत आहेत.त्यांच्या प्रचारासाठी ना रामदास आठवले बंगळुरू आणि कोलार या जिल्ह्यांचा दौरा केला. कर्नाटक मध्ये रिपब्लिकन पक्षाचे बंगळुरू मतदारसंघात डॉ. एम एस वेंकट स्वामी ; चिकोडी मतदारसंघात मगदूम इब्राहिम; कोलार मतदारसंघात वेंकटेश आप्पा ; बेळगाव मतदारसंघात सिकंदर इर्शाद हे चार उमेदवार लोकसभा निवडणूक लढत आहेत.कर्नाटकात एकूण 28 जागा असून उर्वरित 24 जागांवर
रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा देण्यात आला आहे. मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने कर्नाटकात 17 जागा जिंकल्या होत्या यंदाच्या निवडणुकीत मात्र भाजप 20 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास ना रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.