Home » ब्रेकिंग न्यूज » अन् धनंजय मुंडेंचा बुलेटवरुन प्रचार..

अन् धनंजय मुंडेंचा बुलेटवरुन प्रचार..

अन् धनंजय मुंडेंचा बुलेटवरुन प्रचार..

डोंगरचा राजा / आँनलाईन

अंबाजोगाई — राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेले धनंजय मुंडे राज्यातील राष्ट्रवादीच्याच नव्हे तर काँग्रेसच्या आणि आघाडीतील इतर पक्षांच्या उमेदवारांसाठी हेलीकॉप्टरने राज्यभरात फिरत असले तरी आपल्या मतदारसंघात फिरतांना त्यांनी चक्क बुलेटवरून प्रचार करत आपण राज्यभर हेलीकॉप्टरने प्रचार करीत असलो तरी मतदारसंघात मात्र आपण जमीनीवरच चालतो, हे दाखवुन दिले आहे.

बीड लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी आज तालुक्यातील राडी येथे प्रचारसभेला जातांना अंबाजोगाई कारखान्यापासुन युवक कार्यकर्त्यांनी मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले होते.

रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांमध्ये क्रेझ असलेल्या बुलेटची संख्या होती. धनंजय मुंंडे यांचेही बुलेटप्रेम सर्वश्रुत असल्यामुळे रॅलीची सुरूवात होताच त्यांनाही बुलेटवर बसण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी चक्क एका कार्यकर्त्याची बुलेट आपल्या हाती घेत रॅलीचे नेतृत्व केले.

युवकांचे आयकॉन असलेले धनंजय मुंडे स्वतःच रॅलीत उतरल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुपटीने वाढला. राडीपर्यंत बुलेट चालवुन रस्त्यावरील मतदारांना धनंजय मुंडे यांनी सोनवणे यांना विजयी करण्याचे आवाहनही केले.

धनंजय मुंडे यांच्या बुलेट रॅलीची मतदारसंघात चांगलीच चर्चा होत आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार राज्यभर करण्यासाठी वेळ अपुरा पडत असल्याने हेलीकॉप्टरचा वापर करणार्‍या धनंजय मुंडे आपल्या परळी या विधानसभा मतदारसंघात मात्र सामान्य कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या प्रमाणे मिसळुन त्यांना आपलेपणाची जाणीव करून देतात, म्हणुनच धनंजय मुंडे हे सध्या युवकांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.