हसू फुलविण्यासाठी प्रयत्नशील – डॉ. झावर
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
बीड – सामाजिक कार्यातून समाज जोडण्याचे काम- लाँ. देवेंद्र डाके शेवटच्या रूग्नांपर्यत शिबिराचे आयोजन – डाँ. राजेंद्र सारडा प्रत्येक मानसाला समाजात उठून दिसायला आवडत असते पण काहीजण त्यास अपवाद ठरतात मग अशा लोकांना शारिरीक व्यंग मनात अपराधी भाव जागरूक करीत असतात अशा शारिरीक व्यंग असलेल्या रूग्णांच्या चेहऱ्यावर प्रगत तंत्रज्ञानाचा बळावर हसू फुलविण्याची किमया डॉक्टर साधित असतात. आज पर्यत अनक कान,नाक व चेहऱ्यावरील बाहय व्यंगावरील रूग्णावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना समाजात मानाने जिवन जगण्यातील दुवा होण्याचे भाग्य आम्हाला मिळाले असून भविष्यात ही रूग्णसेवेसाठी प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन डॉ. घरंगनाय झावर यांनी तर लाँयन्स क्लबच्या माध्यमातून आज पर्यत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून सामाजिक कामातून समाजमनात वेगळे स्थान तयार करण्यात आले अषल्याचे प्रतिपादन लाँयन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र डाके यांनी तर मागील काळापासून जर्मन फाऊडेशन मुंबई, माहेश्वरी प्रगती मंडळ बीड , रोटरी क्लब बीड.विवेकानंद हाँस्पिटल , जिल्हा रूग्णालय बीड, लाँयन्स क्लब बीड यांच्या सहभागीने दुभंगलेले ओठ , कान,नाक या शारिरीक व्यंगावरील रूग्णासाठी बीड शहरात तपासणी व आवश्यक असलेल्या रूग्णांवर येयील विवेकानंद हाँस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्यात येणारअसून अवघड असणाऱ्या शस्त्रक्रिया मुंबई येथे मोफत करण्यात येणारआहेत याचा अनेक रूग्णांनी लाभ घेतला असून भविष्यात ही या आजारावरील शेवटच्या रूग्णांची तपासणीचा लाभ मिळेपर्यंत शिबिराचे सातत्यपूर्ण आयोजन करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन शिबिराचे आयोजक डॉ.राजेंद्र सारडा यांनी केले. शुक्रवारी दि. १२ रोजी पत्रकार भवन भाजी मंड थेथे ओठ, कान, नाक बाहय व्यंगावरील रूग्णासाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी डॉ रंगनाय झावर व त्यांच्या सर्व डॉ क्टर टिमने जवळपास ९० रूग्णांची तपासणी केली .तर शनिवारी व रविवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत शुक्रवारी संपन्न झालेल्या तपासणी शिबिरात शिबिराचे आयोजक विष्णूदास बियाणी यांनी सखोल मार्गदर्शन व उपस्थितांचे स्वागत केले तर यावेळी अँड ओमप्रकाश जाजू, सि.ए. गोपाल कासट, ईश्वर चरखा,सुरज लाहोटी, राजुशेट बंब, प्रकाश राका, वट्टमवार,दिलीप मंत्री, गणेश कासट, राम मानधने, डॉ. बि जी.झंवर, तुकाराम पवार, वसंतराव डावकर,दादासाहेब डावकर, जिओ गिता परिवाराच्या सौ.लताताई मस्के आदिसह लाँयन्स क्लबच्या सदस्य, विविध ठिकाणाहून आलेले रूग्ण, नातेवाईक, महिला, पुरुष नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी शिबिरास भेट देऊन उत्साह वाढविला.