Home » राजकारण » विकासाच मुसळ कसं दिसेल ? – नाईकनवरे

विकासाच मुसळ कसं दिसेल ? – नाईकनवरे

विकासाच मुसळ कसं दिसेल ? – नाईकनवरे

डोंगरचा राजा / आँनलाईन

— जातीचं कुसळ डोळ्यात गेलेल्यांना प्रीतमताईंच्या विकासाच मुसळ कसं दिसेल ? — नितीन नाईकनवरे

जाता जात नाही त्या जातीच्या राजकारणाचा खेळ लोकसभेच्या निमित्ताने खेळला जात असून मतपेटीच्या गोळा बेरजेत जात आडवी आणणाऱ्याना कोर्टात टिकलेले आरक्षण व आरक्षणामुळे मराठा समाजाला होऊ लागले फायदे हे विध्यमान सरकारचे फलित असून ते विरोधकांना का दिसत नाही असा सवाल बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी उपस्थित केला असून ज्यांनी मराठा आरक्षणाचा काहीच केले नाही ते आता निवडणुकीच्या निमित्ताने जात आडवी आणून आपल्या नैतिक अधःपतनाचे प्रदर्शन करीत आहेत ज्यांच्या डोळ्यात जातीचं कुसळ गेलेलं आहे त्यांना विकासाचं मूसळ कसं दिसल असाही घणाघात त्यांनी केला आहे.
प्रितम मुंडे यांच्या प्रचार्थ तालुकातील मनुर येथील बेठकी वेळी बोलतं होते या वेळीं आ. आर.टी. देशमुख,माझी आ. केशव आंधळे,हनुमान कदम, नितीन काळे आदी उपस्तीत होते पुढे बोलताना नाईकनवरे म्हणाले की बीड जिल्ह्याच्या इतिहासात कधी नव्हे तो विकास प्रामाणिकपणे साधणाऱ्या डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्यावर बोलायला कुठलाच मुद्दा नाही म्हणून जातीचा मुद्दा आडवा आणण्याचे महापातक विरोधक करीत आहेत, चौफेर विकासाच राजकारण करीत असताना मुंडे भगिनींनी कधीही जात आडवी येऊ दिली नाही. माजलगाव मतदारसंघात गावोगाव विविध कामांसाठी कोट्यवधींचा निधी दिला त्यामुळे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघातील जनतेला आघाडी आणि युती शासनाच्या काळातील तुलनात्मक विकास दृष्टीस पडतो परंतु विरोधकांच्या डोळ्यात जातीचं कुसळ अडकल्याने त्यांना हा विकास कुठून दिसणार ? जातीपातीचे आकुंचित राजकारण पुढे करून विकास कामांमधील सातत्य थांबविण्यासाठी विरोधक रचित असलेल्या षड्यंत्रात जनता अडकणार नाही. तर जनता आशा जातीयवाद्यांना नक्कीच धडा शिकवणार आहे . मराठा समाजाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ने दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं नाही तेच युती शासनाने दिलेलं आरक्षण कोर्टात ठाम आहे याची प्रचिती आत्ताच नागपूर उच्च न्यायालयाने श्रीहरी अणे यांनी वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजातील मुलांना दिलेल्या सवलती रद्द करण्या संबंधीचे प्रकरण न्यायालयाने फेटाळले यातून दिसून येत आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा होत असलेला फायदा काहींना चांगलाच जिव्हारी लागत असल्याने युती शासनाने दिलेले आरक्षण चुकीचे असल्याचा कांगावा करीत मराठा युवकांची दिशाभूल करीत जातीचे विष पेरलं जात आहे अशा चुकीच्या अफवाना मराठा समाज भीक घालणार नाही तसेच जातीचं आकुंचन करणाऱ्या विरोधकांना कितीही खेटे घातले तरी जाती ह्या किती प्रसरीत झाल्या आहेत हे डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या विजयातून दिसून येईलच असा विश्वास नितीन नाईकनवरे यांनी प्रसार माध्यमांजवळ व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.