अभिनव प्रतिष्ठानची पाणपोई सुरू..
डोंगरचा राजा / आँनलाईन
माजलगाव — क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवाच्या औचित्याने भाटवडगाव येथील अभिनव प्रतिष्ठानच्या वतीने वाटसरूंसाठी केसापुरी वसाहत येथील मुकबधिर शाळेजवळ राष्ट्रीय महामार्गावर पाणपोई सुरू करण्यात आली.
मंगलनाथ मल्टीस्टेटचे अध्यक्ष आर.जी.कानडे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी त्यांनी अभिनव प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले तसेच पाणपोईसाठी आर्थिक सहकार्य करणार असल्याचेही सांगितले.
याप्रसंगी रामराव इबिते,चंद्रशेखर तौर, राहूल टाकणखार,अशोक वाडेकर,वसंत टाकणखार,प्रकाश आगे, अजयभैय्या शिंदे,बाबा राऊत, मोरेश्वर मसलेकर, बळीराम वायबसे,शेख मतीन,रूपेश पांचाळ, अशोक सुर्यवार,अश्विन चौधरी, अभिराज इबिते,शामला पाटील,माधुरी कुलकर्णी,गायत्री खोडवे,शुभांगी कुलकर्णी,निर्मला चव्हाण,जमिला शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
अभिनव प्रतिष्ठानचे सचिव अभिमन्यु इबिते यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.