Home » विशेष लेख » म्हणून संस्कृतीचा ह्रास होतो – रामदासी

म्हणून संस्कृतीचा ह्रास होतो – रामदासी

म्हणून संस्कृतीचा ह्रास होतो- हभप रामदासी

डोंगरचा राजा / आँनलाईन

गेवराई – प्रकृतीमध्ये संस्कृतीचा आचार असेल तर याला विकास म्हणतात पण आज सुधारणेच्या गोंडस नावाखाली प्रकृतीमध्येच विकृती निर्माण होत आहे. चंगळवादाच्या नावाखाली माणूस नको त्या व्यसनाच्या आहारी जात आहे. रामायणाने आदर्श जीवन कसे जगावे हे सांगितले. जीवन जगण्यासाठी नीतिधर्माची गरज असते. ही नीतीमूल्ये रामायणातून शिकवली जातात. यासाठी रामायणाची नितांत गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांनी रामकथा प्रवचनांतून व्यक्त केले. ते गेवराई तालुक्यातील रुई (धानोरा) या गावी राम नवरात्रातील प्रवचनमालेत बोलत होते.            पुढे बोलतांना ह.भ.प. राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी म्हणाले की, आज देवाची भक्ती करणारे लोक भरपूर आहेत पण देवाला आवडणारी भक्ती करणारे लोक कमी आहेत. आपण आपल्याला आवडणारी भक्ती करतो. शबरीने देवाला आवडणारी भक्ती केली. गुहकाने देवाला आवडणारी भक्ती केली. सत्पुरुषाच्या, देवाच्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करणे हीच भक्तीसाधना आहे. ती केली तरच देव मिळेल असे प्रतिपादन भरतबुवा रामदासी यांनी केले. रुई (धानोरा) येथे श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या काळातील प्राचीन श्रीराम मंदिर आहे. राम नवरात्रात येथे भजन, कीर्तन, प्रवचन, रामकथा, श्रीसमर्थ सांप्रदायिक उपासना इ भरगच्च कार्यक्रम आयोजित केले जातात. हनुमान भजनी मंडळ, गणपती भजनी मंडळ, महिला भजनी मंडळाचे विविध मंडळाचे कार्यक्रम नऊ दिवस संपन्न होतात. या कार्यक्रमासाठी गावकरी यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो.

Leave a Reply

Your email address will not be published.