Home » ब्रेकिंग न्यूज » पीटीएनटीएस परीक्षेचे बक्षीस वितरण –

पीटीएनटीएस परीक्षेचे बक्षीस वितरण –

पीटीएनटीएस परीक्षेचे बक्षीस वितरण –

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन-

पाटोदा- येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आयोजित पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध परीक्षा 2018 -19 च्या झालेल्या परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ विद्यालयाच्या प्रांगणावर मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य तथा प्रगती शिक्षण संस्थेच्या सचिव सौ सत्यभामा ताई बांगर ह्या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच सय्यद वाहब पत्रकार विजय जोशी मुख्याध्यापक जाधव एल. आर.,मुख्याध्यापक ढोरमारे सर मुख्याध्यापिका अंजली देवकते पठाण एम येन .श्रीमती भोपळे मॅडम त्याचप्रमाणे पत्रकार महेश बेंद्रे सय्यद सज्जाद पत्रकार विजय जाधव पत्रकार हमीद खान पठाण डॉ.कल्याण पोकळे डॉ. राऊत डॉ.शेख इम्रान खाजगी क्लासेस चे संचालक रवींद्र दूरं दे राजेंद्र आवळे अशोक पवार गायकवाड सर परीक्षा प्रायोजक यश कॉम्प्युटर चे संचालक बाळासाहेब मंडलिक ,शहीद जवानअजित वालेकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुजित वालेकर कै. सुधाकर राव देशमुख गुरुजी यांच्या स्मरणार्थ बक्षीस प्रा योजक श्री किशोर देशमुख कै.जगन्नाथराव सानप यांच्या स्मरणार्थ प्रायोजक. प्रदीप सानप के. सिंधुबाई सुमंत राव नंद यांच्या स्मरणार्थ प्रायोजक प्रा सुधीर नंद सह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय पाटोदा तालुक्यात एक शैक्षणिक चळवळीचा भाग म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये पाठीमागे राहू नये म्हणून एक विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्याचा सराव व्हावा व परीक्षेच्या बाबतीत आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून विद्यालयाने सामाजिक सहभागातून रोख रक्कम प्राप्त करून विद्यार्थी निवडून गौरव करण्याची परंपरा नऊ वर्षापासून यशस्वीरीत्या पूर्ण केली असून यामध्ये अनेक समाजातील शिक्षणप्रेमी नागरिक या परीक्षेचे प्रायोजकत्व स्वीकारत असल्याने हा उपक्रम यशस्वी करण्यामध्ये वसंतराव नाईक विद्यालय आघाडीवर आहे.जानेवारी 2019 रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती या परीक्षेसाठी पाटोदा तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक ४२शाळांनी सहभाग घेऊन तब्बल 22 24 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते यावेळी झालेल्या परीक्षेचे मूल्यमापन व निकांल त्याच दिवशी जाहीर करण्यात आला होता. या निकालांमध्ये अ गट मधून सोनवणे गौरव सुभाष वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा सर्वप्रथम सुरवसे तेजस सुशीलकुमार भामेश्वर विद्यालय पाटोदा दुतीय तर शेंडगे दिपक शिवनाथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावळ वाडी हा तिसरा तर सांगळे दिनेश राजू नवनिर्माण प्रशा पाटोदा पवळ विश्व अाबासाहेब नवनिर्माण प्रशा पाटोदा भोसले श्रीनिवास नवनाथ वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा पारगावकर तेजेश आशिष भामेश्वर विद्यालय पाटोदा खोले सिद्धार्थ सचिन वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा हे विद्यार्थी उत्तेजनार्थ म्हणून सर्वप्रथम आले तर गट ब साठी स्वामी वेदांत निरंजन वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा प्रथम चव्हाण ओम गोवर्धन दुतीय कुमारी मोहोळकर मोहिनी गणेश भामेश्वर विद्यालय पाटोदा तृतीय कुमारी खेडकर आदिती नागनाथ वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा तृतीय तर चौरे कृष्णा यशवंत भामेश्वर विद्यालय कुमारी माने वर्षा अशोक वसंतराव नाईक विद्यालय नागरगोजे ओम कैलास वसंतराव नाईक दोईफोडे आदित्य रामराव भामेश्वर विद्यालय पाटोदा गोपाळ घरे उज्वल रघुनाथ वसंतराव नाईक विद्यालय हे विद्यार्थी उत्तेजनार्थ गट क नागरगोजे स्मिता संजय वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा प्रथम कुमारी खेडकर प्रिया विजय द्वितीय गरजे महेश महारुद्र हे द्वितीय तर कुमारी माने स्नेहल अशोक देशमुख भगवती किशोर वसंतराव नाईक तृतीय ,नाईक नवरे प्रियांका हरिभाऊ भामेश्वर विद्यालय नेमाने वैष्णवी बाळू वसंतराव नाईक गायकवाड अभिनव गोविंद वसंतराव नाईक घुमरे अंजली अनिल भामेश्वर विद्यालय घुमरे वैष्णवी राजेंद्र बांगर स्नेहल शंकर भोंडवे अंजली सुदाम शिंदे आरती नवनाथ उत्तेजनार्थ म्हणून जाहीर करण्यात आले होते या सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्प हार स्मृतिचिन्ह व रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले यावेळेस यावेळी सायबर ओलंपियाड मॅथ सायन्स या परीक्षेमध्ये मेडल प्राप्त विद्यार्थ्यांचा विद्यालयातील व नवनिर्माण प्रा.शा.मधील विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला याप्रसंगी प्रगती शिक्षण संस्थेच्या सचिव तथा प्राचार्य सत्यभामा ताई बांगर मुख्याध्यापक जाधव एल आर. पत्रकार विजय जोशी यांची समयोचित शुभेच्छा भाषणे झाली यावेळी सत्यभामा ताई बांगर आपल्या भाषणात म्हणाल्या की वसंतराव नाईक विद्यालयाने जो राज्यात शैक्षणिक पॅटर्न निर्माण केला आहे तो कौतुकास्पद असून तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व आत्मविश्वास निर्माण करणारा उपक्रम विद्यालयांमध्ये नावलौकिक मिळविला असल्याचे सांगून यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी प्रस्तविक मध्ये परीक्षेचे मुख्य संयोजक तथा प्राचार्य तुकाराम तुपे यांनी परीक्षेविषयी भूमिका विशद करून सर्वच क्षेत्र वसंतराव नाईक विद्यालय आघाडीवर राहील याबाबतीत विद्यालयातील सर्व टीम काम करीत असल्याचे सांगून भविष्यातही सर्व क्षेत्रांमध्ये या विद्यालयाचा विद्यार्थी यश मिळविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंडित जायभाय एम आर नागरगोजे यांनी केले तर आभार शेख गणि यांनी व्यक्त करून राष्ट्र गीतानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी गुंवणत विद्यार्थ्यांचे पालक ,भगिनी ,व इतर पालक नागरिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.