Home » देश-विदेश » पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आ.क्षीरसागर भेट

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आ.क्षीरसागर भेट

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आ.क्षीरसागर भेट

डोंगरचा राजा / आँनलाईन

— विरोधकांच्या पोटात गोळा उठला

बीड – राष्ट्रवादीचे बडे नेते आमदार जयदत्त क्षीरसागर आपल्या बंधूसोबत काल रात्री उशिरा मातोश्रीवर दाखल झाले आणि त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. क्षीरसागर मातोश्रीच्या भेटीला पोहोचताच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष या भेटीकडे लागले आणि चर्चेला उधाण आले, तर्क वितर्क लावले गेले. या भेटीने विरोधकांच्या पोटोत गोळा उठला.

परवा बीडमध्ये राष्ट्रवादीवर नाराज असलेले बीड जिल्ह्यातील बडे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन आपला निर्णय जाहीर केला. शिवसेना-भाजप उमेदवारांना निवडून आणा अशी घोषणा देत जयदत्त क्षीरसागर, त्यांचे बंधू नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह समर्थक युती चार उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या कामाला लागले. अवघ्या काही तासात बीडमध्ये असलेले जयदत्त क्षीरसागर मुंबईमध्ये दाखल झाले आणि थेट मातोश्री वर जाऊन त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काही वेळानंतर क्षीरसागर मातोश्री बाहेर पडले. या भेटीची बातमी बीड जिल्ह्यासह राज्यभरात वेगाने पसरली. या भेटीला मोठे राजकीय महत्व प्राप्त झाले. जिल्हाभरात तर्कवितर्क लावले गेले, मात्र ही भेट एक सदिच्छा भेट होती. महायुतीला पाठिंबा दिला आहे , शिवसेना यातील महत्त्वाचे घटक आहे, त्यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या, एवढेच कारण असल्याचे क्षीरसागर यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

जयदत्त क्षीरसागर गेल्या 40 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत, त्यांच्या मातोश्री माजी खासदार दिवंगत केशरकाकू क्षीरसागर या बीड जिल्ह्याच्या पंधरा वर्षे खासदार होत्या. जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबाची मजबूत पकड आहे. जयदत्त क्षीरसागरही चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. विविध खात्याचे मंत्रिपद ही त्यांनी भूषवले आहे. अनेक सहकारी संस्था, शिक्षण संस्थेचे जाळे निर्माण केले आहे. बीडची नगर पालिका चाळीस वर्षांपासून त्यांच्या ताब्यात आहे. आधी काँग्रेसनंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवारासोबत त्यांनी काम केले आहे. अलीकडच्या काळात राष्ट्रवादीमध्ये त्यांची गळचेपी होत असल्याने त्यांनी राष्ट्रवादीपासून दूर होत आपला राजकीय पाठिंबा शिवसेना-भाजपला जाहीर केला आणि अवघ्या काही तासात मातोश्रीवर भेट घेतल्याने विरोधकांच्या पोटात गोळा उठला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.